मुंबई – मोबाईल क्षेत्रातील अग्रगण्या कंपनी रिलायन्स जिओचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी मोठी घोषणा केली आहे. पुढील वर्षी म्हणजेच २०२१ च्या अखेरीस जिओची 5G सेवा सुरू होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या ऑनलाईन मोबाईल काँग्रेसमध्ये अंबानी यांनी ही माहिती दिली आहे. सर्व मोबाईल कंंपन्यांचे प्रमुख या मोबाईल काँग्रेसमध्ये सहभागी झाले होते.
इंटरनेट वापरकर्त्यांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे. 5Gमुळे अमुलाग्र बदल घडणार असून वापरकर्त्यांना अधिक वेगवान इंटरनेट वापरता येणार आहे. 5Gसाठई आवश्यक तंत्रज्ञान आणि अन्य तयारी कंपनीकडून सुरू असल्याचे अंबानी यांनी सांगितले. हे तंत्रज्ञान संपूर्ण स्वदेशी बनावटीचे राहणार आहे. 5Gच्या लहरींबाबत (स्पेक्ट्रम) केंद्र सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यायला हवेत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे. देशभरात सध्या ३० कोटी ग्राहक हे 2G वापरत आहेत. त्यांच्या पर्यंत पोहचणे आवश्यक असल्याचेही अंबानी यांनी म्हटले आहे.