शनिवार, जून 21, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

वैद्यकीय क्षेत्रात ए टू ई तत्वांचे पालन होणे काळाची गरज – अमित देशमुख

by India Darpan
सप्टेंबर 5, 2020 | 4:01 pm
in संमिश्र वार्ता
0
Amit Deshmukh 1 640x375 1

मुंबई – वैद्यकीय क्षेत्रात काम करताना आपल्यामधला आविर्भाव, दुसऱ्यांबरोबर वागण्याची पद्धत, संवाद, डॉक्टर आणि रुग्ण यांच्यामधले नाते आणि नीतिमूल्य यांची नितांत आवश्यकता आहे. येणाऱ्या काळात वैद्यकीय क्षेत्रात ए टू ई तत्वांचे पालन होणे काळाची गरज आहे, असे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले.

 

देशातील सर्व वैद्यकीय क्षेत्रासाठी तसेच सर्व जनतेसाठी उपयुक्त पुस्तक बियोंड मेडीसिन : ए टू ई फॉर मेडिकल प्रोफेशनल (Beyond Medicine: A to E for Medical Professionals)हे पुस्तक आज ऑनलाईन प्रकाशित झाले. या ऑनलाईन पुस्तक प्रकाशनाचे http://www.parthlive.com यावर लाईव्ह स्ट्रीमिंग करण्यात आले. यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री. देशमुख यांच्यासह वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक डॉ. तात्याराव लहाने, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर, पुस्तकाचे लेखक कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण, डॉ. संदीप माने, डॉ. सुनील थितमे, आदी मान्यवर उपस्थित होते.

देशमुख म्हणाले की, सध्या देशभरात नाही तर जगभरात कोविड-१९ मुळे आपत्कालीन परिस्थिती उद्भवली आहे. या काळात आरोग्य यंत्रणा अविरत काम करून रुग्णांना वाचविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. रुग्णांना मृत्यूच्या दाढेतून वाचविणाऱ्या डॉक्टरांना देव मानले जाते. आजच्या परिस्थितीत हेच डॉक्टर खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांसाठी देवदूत ठरले आहे. डॉक्टर, नर्स, आरोग्य सेवक, टेक्निशियन, लॅब असिस्टंट यांनी या काळात केलेले काम महत्त्वपूर्ण ठरले आहे.

चांगले आरोग्य आणि साक्षरता हे सुदृढ समाजाचे लक्षण असते. कारण चांगले आरोग्य आणि शिक्षण असेल तरच समाज आणि पर्यायाने राष्ट्र चांगले बनते. आज भारताने वैद्यकीय क्षेत्रात तंत्रज्ञानामुळे चांगली प्रगती केली आहे हे दिसून आले आहे. आरोग्यदायी समाज आणि सामाजिक स्वास्थ्य मजबूत करण्यासाठी हे पुस्तक नक्कीच महत्त्वाचे ठरेल असे  देशमुख यावेळी म्हणाले.

वैद्यकीय माहिती आणि कौशल्य यावर लक्ष देण्याबरोबरच डॉक्टर आणि रुग्ण यांच्यात अधिक चांगले संबंध कसे होतील यावर लक्ष वेधले जाणे आवश्यक आहे. वैद्यकीय क्षेत्रात अभ्यास करताना विद्यार्थ्यांना भौतिकशास्त्र रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र यांची आवड असते पण याचबरोबर वैद्यकीय शिक्षण चांगल्या पद्धतीने आणि चांगल्या कौशल्याने अंगीकारणे आवश्यक आहे, असे देशमुख यावेळी म्हणाले.

आजच्या काळात वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्यांना विविध समस्या येत असतात. याच विषयावर हे पुस्तक असून वैद्यकीय क्षेत्रातील विविध मार्गदर्शक तत्वे आणि दैनंदिन जीवनात येणाऱ्या समस्यांवर आधारित उत्तरे कशी मिळवायची याची माहिती या पुस्तकातून मिळते. आरोग्य क्षेत्रातील मान्यवर, डॉक्टर, विद्यार्थी, अभ्यासक ऑनलाईन पुस्तक प्रकाशनाला उपस्थित होते.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

जिल्ह्यात ३४  हजार १३५ रुग्ण कोरोनामुक्त, ७ हजार ४६० रुग्णांवर उपचार सुरू

Next Post

पु्ण्याची कोरोना स्थिती गंभीर; शरद पवारांनाच घ्यावी लागली बैठक

Next Post
unnamed 2 1

पु्ण्याची कोरोना स्थिती गंभीर; शरद पवारांनाच घ्यावी लागली बैठक

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी बेकायदेशीर व्यवहार टाळावे, जाणून घ्या, रविवार, २२ जूनचे राशिभविष्य

जून 21, 2025
aditya thackeray e1703150861580

कुठल्याही भाषेला विरोध नाही…आदित्य ठाकरे यांची सोशल मीडियावर केली ही पोस्ट

जून 21, 2025
crime1

वाहनचोरीचे सत्र सुरूच…वेगवेगळया भागातून तीन मोटारसायकली चोरीला…

जून 21, 2025
Oplus_0

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रकट मुलाखत सरस प्रश्नांने रंगली…

जून 21, 2025
Untitled 70

नाट्य आणि चित्रपट अभिनेता तुषार घाडीगावकर याची आत्महत्या…

जून 21, 2025
crime 13

धक्कादायक…बाल्कनीत साठलेल्या पाण्याच्या वादातून लोटून दिल्याने एकाचा मृत्यू

जून 21, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011