मुंबई – वेब सिरीजच्या नावाखाली अश्लिल चित्रपट बनवणाऱ्या टोळीचा भांडाफोड करत मुंबई पोलिसांनी ५ जणांना अटक केली आहे. बॉलिवूड चित्रपटामध्ये काम मिळवण्यासाठी धडपडणाऱ्या मॉडेल्सना वेब सीरिजमधील भूमिकांचे खोटे आश्वासन देऊन पोर्न फिल्ममध्ये ढकलले जात होते. यानंतर ही टोळी सोशल मीडिया अॅप्स आणि वेबसाइटवर हे अश्लील चित्रपट अपलोड करत होते.
या प्रकरणी अटक केलेल्यांमध्ये एक अभिनेता, एक कर्मचारी आणि एक महिला छायाचित्रकार आणि ग्राफिक डिझायनर यांचा समावेश आहे. मालाडमधील मध्य भागातील बंगल्यात हा गैरकारभार सुरू असल्याची खबर पोलीसांना लागताच छापा टाकला असता हे चार जण पकडले गेले. त्यावेळी येथे मोबाइल फोन कॅमेऱ्याच्या मदतीने पॉर्न फिल्मचे शूटिंग चालू होते.
कारवाई दरम्यान एका पिडीत महिलेची यातून सुटका करण्यात आली. यावेळी पोलिसांनी सांगितले की, या छाप्यात सहा मोबाइल फोन, एक लॅपटॉप, कॅमेरा, संबंधित उपकरणे, मेमरी कार्ड आदि जप्त करण्यात आले असून त्यांची किंमत साडेसहा लाख रुपये आहे. आरोपींच्या बँक खात्यातील सुमारे लाख रुपयेही जप्त आले आहेत. आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून या सर्वांना दि.10 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.