नाशिक – आयुर्विमा क्षेत्रातील पंचवार्षिक वेतन करार १ ऑगस्ट २०१७ रोजी देय झालेला असून अद्याप त्याला अंतिम स्वरूप प्राप्त झालेले नाही. या आधी झालेल्या वाटाघाटींमध्ये व्यवस्थापनाने १५% वेतनवाढीची ऑफर दिलेली होती तीत भरीव सुधारणा करून वेतनकरार प्रत्यक्षात यावा म्हणून आयुर्विमा कर्मचारी फेडरेशन, नाशिकच्या वतीने दि.१०.१२.२०२० रोजी तीव्र निदर्शने एल आय सी कार्यालयासमोर झाली.या प्रसंगी करूणासागर पगारे,शेखर मोघे, संजय कोकाटे आदींनी मार्गदर्शन केले. अशाच प्रकारची निदर्शने १५ डिसेंबर २०२० रोजी होणार असून येत्या २२ डिसेंबर रोजी २ तासांच्या संपाची हाक फेडरेशनने दिली आहे. द्वारसभेच्या यशस्वीतेसाठी किशोर निकम, मनोज मराठे,विवेक कुलकर्णी, विरेंद्र परदेशी, महेश मोरे, राजू शिंदे, उदय जाधव, राजू ठोंबरे, प्रमोद देवरे, राजू शिंत्रे आदींनी परिश्रम घेतले.