चांभरलेणी व म्हसरुळ येथे अभियान
नाशिक ः शहरातील चांभरलेणी आणि म्हसरुळ परिसरात वृक्षलागवड अभियानास प्रारंभ करण्यात आला आहे. २६ जुलै ते ऑगस्ट या सप्ताहात एक हजार वृक्ष लागवड चांभरलेणी व म्हसरूळ येथील डोंगरावर केली जाणार आहे. आज या सप्ताहाचा उद्घाटन प्रसंगी डॉ. सुभाष अहिरे प्रा. सुनिता जगताप-अहिरे समवेत आयोजक हर्षल इंगळे, सचिन लोणारी, प्रशांत इंगळे, कमलेश शिरसागर, ऋषिकेश इंगळे आदी उपस्थित होते. वृक्ष लागवडीत सहभागी होणाऱ्या घटकांनी पाण्याची बाटली, तोंडाला लावायचा मास्क व इतर साहित्य बरोबर आणले. चांभरलेणी परिसरात आंबा, जांभूळ, सोनचाफा, बदाम, आवळा, बांबू इत्यादी झाडे वन विभाग नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली लावण्यात आली. बालमित्रांनी लावलेल्या झाडांना त्यांनी नावे देऊन वृक्ष संवर्धन करण्याची जबाबदारी देखील घेतली. ह्या उपक्रमात सकाळी फिरायला येणाऱ्या व्यक्ती आणि समूहांनी सुद्धा सहभाग नोंदवला.