श्री. भरणे म्हणाले, आज कारगिल विजय दिवस आहे. वीरजवान वाघ हे आपल्या सेवेसाठी सैन्यात भरती झाले होते. त्यांचा काश्मिरमधील लेहमधून कारगिलकडे जाताना अपघातात मृत्यू झाला होता. शासन त्यांच्या कुटुंबाच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहील. शासनाच्या वतीने सर्वतोपरी सहकार्य केले जाईल. ग्रामस्थांनी वीरजवान वाघ यांच्या कुटुंबाला आधार देऊन सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले. वीरजवान वाघ यांच्या कुटुंबियांच्या वतीने जि.प. सदस्या रेखा राऊत यांनी पत्नी राणी वाघ यांना अंगणवाडीसेविका म्हणून घेण्याची मागणी निवेदनाद्वारे पालकमंत्री श्री. भरणे यांच्याकडे केली. यावेळी आमदार यशवंत माने, सरपंच श्री. जाधवर, वीरजवान वाघ यांचे वडील सोमनाथ वाघ, आई राजूबाई, पत्नी राणी, दोन्ही मुली, मुलगा आणि ग्रामस्थ उपस्थित होते.