नाशिक – लॉकडाउन काळात नागरिकांना दिलेले भरमसाठ वीज बिल मागे घ्यावी यासाठी नाशिक शहर भाजपच्यावतीने आज (३ ऑगस्ट) पदयात्रा काढण्यात आली.
लॉकडाउनच्या काळात जनतेचे उत्पन्नाचे स्रोत मोठया प्रमाणावर कमी तरी झाले किंवा थांबले आहेत. अशा आर्थिक संकटात सरकारने जनतेची वीज बिले माफ करण्याऐवजी अव्वाच्या सव्वा बिले दिली आहेत. एकतर ही बिले माफ करावीत किंवा वस्तुस्थिती वर आधारित सुधारित बिले देण्यात यावी या मागणी साठी नाशिक शहर भाजप पदयात्रा काढण्यात आली. पदयात्रेत शहराध्यक्ष गिरीश पालवे, आमदार राहुल ढिकले, लक्ष्मण सावजी, मध्य मंडळ अध्यक्ष देवदत्त जोशी, नाशिक रोड मंडळ अध्यक्ष हेमंत गायकवाड, संगीता गायकवाड, संभाजी मोरुस्कर, शरद मोरे, दिनकर आढाव यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले.
अशी निघाली पदयात्रा
सकाळी ९ ते १० या कालावधीत पवन नगर ते सिटी सेंटर मॉल पर्यंत निघाली. यात भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले. सकाळी ११ ते २ या कालावधीत भाजप पदाधिकारी व लोकप्राधिनिधींच्या उपस्थितीत द्वारका, काठे गल्ली सिग्नल, ड्रीम सिटी शिवाजी नगर, उपनगर येथून नारायण बापू नगर सर्कल व नंतर विद्युत भवन, बिटको येथे ही पदयात्रा काढण्यात आली. वाढीव बिल आकारणी कमी करून सुधारित बिले द्यावीत किंवा माफ करावीत यासंदर्भातील निवेदन महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आले.