मुंबई – लॉकडाऊन काळातील वीज बीलातील स्थिर आकार रद्द करण्याच्या प्रश्नावर अर्थमंत्री व उद्योग मंत्री यांची संयुक्त बैठक घेऊ. तसेच स्थिर आकार रद्द करण्यासाठी वीज नियामक आयोगाकडे पाठपुरावा करू, अशी ग्वाही ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँण्ड अग्रिकल्चरच्या शिष्टमंडळास दिली.