नवी दिल्ली – नाशिक जिल्ह्याचे आज गहू, द्राक्ष, कांदा, हरभरा इतर रब्बी पिकांची काढणी चालू आहे. याकरता वेळेवर शेतीला पाणी देणे गरजेचे असतांना महाराष्ट्र राज्य सरकारने एक शासन निर्णय (जी.आर.) काढला आहे. जर विज बिल भरले नाही तर कनेक्शन कट करायचे. यावर खासदार डॅा. भारती पवार यांनी संताप व्यक्त केला. या प्रश्नांवर त्यांनी लोकसभेत लक्षही वेधले. या निर्णयाचा खा. डॉ. भारती पवार यांनी संसदेत निषेधही केला.
खा. पवार म्हणाल्या की, आज शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने विजेची गरज आहे. त्यांना नोटीस दिली पाहिजे.. सवलत दिली पाहिजे.. परंतु चार शेतकऱ्यांनी वीज बिल भरले नाहीत तर शंभर शेतकऱ्यांची भरलेले वीजबिले न बघता तात्काळ गावातीलच डीपीवरून दिले गेलेले कनेक्शन बंद करण्यात येत आहेत.यावेळी त्यांनी सर्वसामान्य जनतेचा व शेतकऱ्यांचा वीज पुरवठा खंडित न करता तात्काळ सुरळीत करण्यात यावा. अशी मागणी त्यांनी केली.
शेतकऱ्यांच्या व सामान्य जनतेच्या गंभीर मुद्यावर खा. डॉ.भारती पवार यांनी संसदेत प्रश्न मांडले. कोरोनाचे संकट असेल किंवा निसर्गाचे संकट असेल शेतकरी मोठ्या धैर्याने हे संकट पेलत आहेत.असेही त्यांनी सांगितले.