मा. मुख्यमंत्री साहेब,
मी श्री बाबाजी वाल्मिक शेलार चंदनपुरी ता. मालेगाव जि. नाशिक येथील रहिवासी असून शेती व्यवसाय करतो साहेब,
विद्युत मंडाळाकडून रात्री ११:३० ते सकाळी ७:३०पर्यंत वीज दिली जाते. दिवसभर शेतात काम करून रात्री पाणी भरण्यासाठी रात्रभर शेतात उभे रहावे लागते. सध्या थंडीचा महिना असून ८ ते १० डिग्री तापमान असते.
शेतकऱ्याबदल सरकारला एवढी चीड का आहे ?
आम्ही रात्रभर का जागं राहायचं ?
जो कोणी हा निर्णय घेतला असेन तो आम्हाला वैरी समजत असावा आणि रात्री शेतीला वीज देता. रात्री डीपी वरील फ्यूज गेला तर तो टाकण्यासाठी मंडळाने रात्रीचे कर्मचारी दिलेले नसतात. आम्हा शेतकऱ्यांना जीव धोक्यात घालून फ्युज टाकावे लागतात.
एवढं करून आमच्या हातात काय पडतंय?????
आम्हाला वाटलं ५७ वर्ष वाटोळं झालं, आता नवं सरकार आलं, चांगले दिवस येतील, पण घरातील मोठी माणसे सांगत होते काहीच फरक पडणार नाही. तरी आमची कोणाकडूनही अपेक्षा राहिली नाही, पण जमते का बघा…..
आहो साहेब, रात्री घरातून बाहेर निघालो तर आई म्हणते भाऊ बुट घातले का?
बायको टॉर्च देते, वडिल म्हणतात काठी घेतली का?
मी येतो तुझ्या बरोबर…. रात्री साप, विंचु, बिबट्या सारखी संकटे असतात,
मी शेतात अंधारात असतांना त्यांना झोप लागत असेल काहाे???
मी तुमच्या कडे फार मोठी मागणी करत नाही. सहज शक्य आहे फक्त शेतीला दिवसा किमान १२ तास लाईट द्यावी, ही कळकळीची विनंती.
प्रत्येक शेतकऱ्यांनी व शेतकऱ्यांबद्दल आत्मियता असणाऱ्यांनी हे खुले पत्र मुख्यमंत्री साहेबांपर्यंत पोहोचवावे. व आम्हा शेतकरी बांधवांना न्याय द्यावा.…
शेतकरी वाचला तरच सरकार वाचेल
आपला एक आशावादी शेतकरी
श्री बाबाजी शेलार चंदनपुरी
मो ९०४९७०७२१८