नाशिक – वीज बिल माफीच्या मागणीसाठी आम आदमी पार्टी नाशिक शहर कमिटीच्या वतीने नाशिकरोडच्या वीज वितरण कार्यालयाच्या ठिकाणी ‘वीजबिल माफ करा, टाळे ठोको’ आंदोलन करण्यात आले.
जिल्हा प्रमुख अँड प्रभाकर वायचळे यांच्या नेतृत्वात महावितरण अधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. राज्य सरकारने नुकत्याच झालेल्या अधिवेशनात वीज बिलांच्या प्रश्नावर निर्णय घेणे आवश्यक होते. पण, सर्वसामान्यांच्या तोंडाला सरकारने पाने पुसली आहेत, असा आरोप आंदोलकांनी यावेळी केला. म्हणूनच राज्यभर आम आदमी पार्टीने महावितरण कार्यलयच्या बाहेर निदर्शने करून महावितरण कार्यलयालाल टाळे ठोकण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. त्याअंतर्गत हे आंदोलन करण्यात आले. नाशिकरोड वीज वितरण कार्यलया बाहेर निदर्शने करून वीज बिलाची होळी करण्यात आली. तसेच, वीज वितरण कार्यलयाला टाळे ठोकण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी हस्तक्षेप करून कार्यकर्त्याना टाळे टोकण्या पासून रोखले. आंदोलनात शहर अध्यक्ष अॅड बंडू डांगे, उपाध्यक्ष जगमेरसिंग खालसा, सचिव अनिल कवशिक, खजिनदार आलताफ शेख, सदस्य नितीन भागवत, विलास मोरे, योगेश कापसे, अभिजित गोसावी, गिरीश उगले, सुमित शर्मा आदी सहभागी झाले.
आपने केलेल्या मागण्या अशा
१. कोविड दरम्यानचे मार्च ते जून या चार महिन्याचे २०० युनिट वीजबिल माफ करावे
२. MSEB कडून दि १ एप्रिल २०२० पासून करण्यात आलेली वीज दर वाढ मागे घ्यावी
३. शिवसेनेच्या जाहीरनाम्यातील आश्वासनाप्रमाणे- ३०० युनिट पर्यंत ३०% स्वस्त वीज देण्याचे आश्वासन पूर्ण करावे
४. राज्य सरकार चा १६% अधिभार आणि वहन कर रद्द करन्यात यावा
५. वीज कंपन्यांचे CAG ऑडीट करण्यात यावे
६. कोविड दरम्यानचे भरमसाठ दिलेले वीजबिल मागे घेवून जुन्या दराने मागील वर्षीप्रमाणे महिनेवारीचे देयक द्यावेत.