नवी दिल्ली – राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या एका कंत्राटदाराने विक्रम केला आहे. २५८० मीटर लांबीच्या चौपदरी काँक्रीट महामार्गाचे बांधकाम अवघ्या २४ तासात त्याने पूर्ण केले आहे. हा थेट विश्वविक्रमच झाला आहे.
सरकारने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, एनएचएआय कंत्राटदार पटेल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडने दिल्ली-वडोदरा-मुंबई या ८ लेन एक्सप्रेसवे प्रकल्पावर चौपदरीकरणाचे काम सुरू होते. यातील २५८० मीटर (सुमारे १०.३२ लेन किलोमीटर) काँक्रीट रस्त्याचे काम सुरू केले.
सकाळी ८ ते दुसर्या दिवशी सकाळी ८ या वेळेत हे काम पूर्ण करण्यात आले. १८.७५ मीटर रुंदीसह सुमारे ४८ हजार ७११ चौरस मीटर क्षेत्रामध्ये काँक्रीट रस्ते तयार करण्यास २४ तास लागले. या कालावधीत १४ हजार ६१३ घनमीटर काँक्रीट (सिमेंट-खडी-वाळू) वापरण्याची नोंदही झाली.
इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये या विक्रमाची नोंद झाली आहे. पटेल इन्फ्रास्ट्रक्चर मर्यादित या कंत्राटदाराने केलेला हा विक्रम इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स अशा दोन्ही संस्थांनी प्रमाणित केला आहे.
हा विक्रम दिल्ली- बडोदा-मुंबई ह्या ८ पदरी हरित द्रुतगती महामार्ग प्रकल्पाचा भाग आहे आणि हा विक्रम करताना जगातील सर्वात मोठ्या, संपूर्णपणे स्वयंचलित,अत्याधुनिक अशा सिमेंट पसरविणाऱ्या यंत्राची मदत झाली.
पटेल इन्फ्रास्ट्रक्चर मर्यादित या कंत्राटदाराने केलेला हा विक्रम इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स अशा दोन्ही संस्थांनी प्रमाणित केला आहे.
हा विक्रम दिल्ली- बडोदा-मुंबई ह्या ८ पदरी हरित द्रुतगती महामार्ग प्रकल्पाचा भाग आहे. हा विक्रम करताना जगातील सर्वात मोठ्या, संपूर्णपणे स्वयंचलित,अत्याधुनिक अशा सिमेंट पसरविणाऱ्या यंत्राची मदत झाल्याचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सांगितले आहे.