नवी दिल्ली – कोणत्याही क्षेत्रातील आघाडीच्या व्यक्तीचा संघर्ष हा इतरांना प्रेरणादायी ठरावा, यासाठी अनेकदा त्याच्या आयुष्यावर चित्रपट किंवा बायोपिक काढला जातो. आतापर्यंत अनेकांवर अशा प्रकारचे बायोपिक काढण्यात आले आहेत. आता असाच एक चित्रपट ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंद याच्या आयुष्यावर काढण्यात येणार आहे. आनंद एल. राय हा चित्रपट बनवणार आहेत. पाच वेळा विश्व चॅम्पियन ठरलेला आनंद हा नुकताच ५१ वर्षांचा झाला आहे.
दरम्यान, आनंदने देखील या चित्रपटाला होकार दिला आहे. विश्वनाथन आनंद याने यापूर्वी अशा अनेक ऑफर्सना नकार दिला होता. यावेळी मात्र, सगळं जुळून आलं आहे. आनंद एल. राय यांनीदेखील चित्रपटाचे दिग्दर्शन करण्यास होकार दिला आहे. यापूर्वी त्यांनी ‘तनू वेड्स मनू’ आणि ‘झीरो’ सारखे चित्रपट केले आहेत. या बायोपिकबाबत अद्याप अन्य काहीही निश्चित झालेले नाही. लवकरच याचाही निर्णय होईल. पुढच्या वर्षी पहिल्या सहा महिन्यात हा चित्रपट सुरु होण्याची शक्यता आहे. यात आनंदची संपूर्ण कहाणी सांगितली जाईल. याआधी महेंद्र सिंग धोनी, मिल्खा सिंह आणि मेरी कॉम यांच्यावर बायोपिक तयार करण्यात आला आहे.