नवी दिल्ली – सिकंदराबाद, अहमदाबादसह महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये जाणाऱ्या प्रवाशांसाठी विशेष रेल्वे चालवल्या जाणार आहेत. हजरत निजामुद्दीनहून सिकंदराबादला जाणारी अशी राजधानी विशेष रेल्वे धावणार आहे. दुसरी विशेष जलद रेल्वे अहमदाबाद ते सुलतानपूर दरम्यान धावणार आहे. या रेल्वेमुळे कन्फर्म तिकीट न मिळणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
हजरत निजामुद्दीन-सिकंदराबाद साप्ताहिक राजधानी एक्स्प्रेस (२४३८-०२४३७)
विशेष राजधानी एक्स्प्रेस ४ एप्रिलपासून प्रत्येक रविवारी हजरत निजामुद्दीनहून दुपारी ३.३५ वाजता निघणार आहे. दुसऱ्या दिवशी १.३५ वाजता ती सिकंदराबादला पोहोचेल. परत येणारी एक्स्प्रेस ७ एप्रिलपासून बुधवारी सिकंदराबादहून दुपारी १२.५० वाजता प्रस्थान करून दुसऱ्या दिवशी १०.३० वाजता हजरत निजामुद्दीनला पोहोचेल. ती झासी, भोपाळ, नागपूर, बल्लालरशाह, काजीपेठ या स्थानकांवर थांबेल.
एर्नाकुलम-पाटणा साप्ताहिक अतिजलद विशेष रेल्वे (०६३५९-०६३६०)
०६३५९ एर्नाकुलम-पाटणा साप्ताहिक अतिजलद विशेष रेल्वे एक एप्रिलपासून पुढील सूचनेपर्यंत प्रत्येक शनिवारी एर्नाकुलमहून रात्री ११.५५ वाजता निघून मंगळवारी सकाळी ६.३० वाजता पाटण्याला पोहोचेल. परतीचा प्रवासात ०६३६० ही पाटणा-एर्नाकुलम विशेष रेल्वे ४ एप्रिलपासून पुढील सूचनेपर्यंत प्रत्येक मंगळवारी पाटणा येथून ४.३० वाजता निघून तिसऱ्या दिवशी रात्री ९.४० वाजता एर्नाकुलमला पोहोचेल. मार्गात रेल्वे अलुवा, त्रिशूर, पालघाट, कोईम्बतूर, तिरुप्पूर, इरोड, सलेम, जोलारपट्टी, कटपाडी, पेरंबूर, गुडूर, नेल्लोर, ओंगल, तेनाली, विजयवाडा, खम्मम, वारंगल, रामगुंडम, मंछेरल, बेलमपल्ली, बल्लारशाह, चंद्रपूर, नागपूर, बेतुल, घोरडोंगरी, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, प्रयागराज जं., प्रयागराज रामबाग, ज्ञानपूर रोड, वाराणसी, पं. दीनदयाल उपाध्याय जं., बक्सर, आरा स्थानकांवर थांबेल.