कळवण – नुकतेच नासिक परिक्षेत्रासाठी नियुक्त झालेले विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.प्रतापराव दिघावकर यांचा सत्कार सोहळा कसमादे परिसरातील नागरिकांच्या वतीने करण्यात आला. कसमादेचे भूमिपुत्र असल्याने नक्कीच या गोष्टीचा येथील नागरिकांना अभिमान आहे. हा सत्कार खा.डॉ.भारती पवार यांच्या हस्ते करण्यात आला याप्रसंगी बोलतांना खा. डॉ.भारती पवार म्हणाल्या की अतिशय कर्तृत्ववान, अभ्यासू आणि कर्तव्य तत्पर जनसामान्यांचे, शेतकऱ्यांचे कैवारी म्हणून दिघावकर साहेबांचा नावलौकिक आहे आणि अशा आमच्या भूमीपुत्राचा सन्मान होणे हे नक्कीच गौरवास्पद आहे.
सत्कार सोहळ्याप्रसंगी देवरे, अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव खांडवी, अप्पर पोलीस अधीक्षक नासिक वावावलकर, कळवण पोलीस निरीक्षक वाघ, पोलीस निरीक्षक देवळा देशमुख, दिंडोरी पोलीस निरीक्षकं बोरसे, जि.प.सदस्य रविबाबा देवरे तथा पंचक्रोशीतील सर्व नागरिक या सत्कार सोहळ्या प्रसंगी उपस्थित होते.