मुंबई – आपण मूर्तीपूजा का करतो, त्याने काय साध्य होते, असा प्रश्न अनेकांना पडतो. मात्र, त्याचे योग्य उत्तर मिळत नाही. स्वामी विवेकानंदांनी मात्र त्याचे योग्य उत्तर दिले आहे. मूर्तीपूजेशी निगडीत अलवर शहराचाही संबंध आहे, त्यामुळे आज आपण तेही जाणून घेणार आहोत.
अलवरचा इतिहास
मत्स्यनगर अर्थात मत्स्यपुरी. महाभरत काळात अलवर शहराची हीच ओळख होती. महाभारताच्याही पूर्वी राजा विराटचे पिता वेणू यांनी मत्स्यपुरीला राजधानी केले होते. अरावली नदीच्या काठावर वसलेल्या अलवरची ओळख किल्ले, हवेली, पुतातत्व वास्तू, सरिस्का अभयारण्यातील वाघ यांच्यामुळे जगभर झाली आहे. पांडवांनी सरिस्कामध्येच अज्ञातवास घालवला होता, अशीही मान्यता आहे. येथील बाला किल्ला, जयसमंद आणि सिलीसेढ झरा, अजबगढ, राजौरगढ, सिटी पॅलेस, फतेहगंज घुमट व भानगड पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र आहे. मात्र अलवरची ओळख याच्याही पुढे आहे. येथील मातीत स्वामी विवेकानंदांच्या अनेक स्मृतींचा गंध आहे.
स्वामीजींची आठवण
स्वामी विवेकानंदांनी आपल्या प्रभावी शैलीत अलवरचे पाचवे राजा मंगलसंह यांना मूर्तीपुजेचे महत्त्व पटवून दिले होते. स्वामी विवेकानंदांचा उल्लेख होताच अलवर येथील ७४ वर्षीय अॅड. हरिशंकर गोयल उत्स्फूर्तपणे बोलू लागले. त्यांनी स्वामीजींच्या आठवणी सांगायला सुरुवात केली. मत्स्यनगरचे लाला गोविंद सहाय यांचे चिरंजीव राजाराम विजयवर्गिय यांच्याजवळ आजही शिकागोवरून स्वामीजींनी पाठविलेली पांती अस्तित्वात आहे. जगभरात स्वामीजींचे शिकागोतील भाषण चर्चेत आले, मात्र अलवर येथे स्वामीजींनी पाठविलेली पांती मोठा संदेश देऊन गेली. अलवर येथे भव्य पाषाण व छोटी कांस्य प्रतिमा तसेच स्मारक याची सातत्याने प्रचिती देतात.
अशी झाली राजाची भेट
अजरमेरच्या सुप्रसिद्ध मेयो कॉलेजचे पहिले विद्यार्थी राहिलेले राजा मंगल सिंह अलवर पाचवे राजा होता. संन्यास घेतल्यानंतर ७ फेब्रुवारी १८९१ मध्ये स्वामीजी पहिल्यांदा अलवरला आले होते. त्यांनी ३१ मार्च १८९१ पर्यंत इथेच वेगवेगळ्या ठिकाणी प्रवास केला. सध्या ज्या ठिकाणी स्वामी विवेकानंद चौक आहे, तिथे पूर्वी एक डोंगर होता. या डोंगरावर बसून स्वामीजी प्रवचन करायचे. महाराजांचे दिवाण कर्नल रामचंद्रदेखील इथे प्रवचन ऐकायला यायचे. त्यांच्याच माध्यमातून स्वामीजींची महती महाराजांपर्यंत पोहोचली. एक दिवस राजाने स्वामीजींनी महालात आमंत्रित केले. तिथे त्यांनी मूर्तीपूजेच्या संदर्भात प्रश्न उपस्थित केले. त्यावर वडिलांचे निधन झाल्यावरही त्यांच्या मूर्तीची पुजा का करता, असा प्रतिप्रश्न स्वामीजींनी राजाला विचारला. त्यानंतर स्वामीजींनी मूर्तीपुजेचे महत्त्व पटवून दिले.
अलवरला पोहोचले होते ९ पत्र
१८९१ ते १८९७ या कालावधीत स्वामी विवेकानंदांनी येथील वेगवेगळ्या लोकांना एकूण ९ पत्रे लिहीली. काही पत्र कर्नल रामचंद्रांच्या वंशजांकडे, तर काही पत्र लाला गोविंद सहाय यांना पाठविली होती. लाला गोविंद सहाय यांना आलेली पत्र राजाराम हन गुप्ता यांच्याकडे आजही जतन केलेली आहेत.
तीनवेळा अलवरला आले स्वामीजी
स्वामी विवेकानंद अलवरला किती वेळा आले, याबाबत वेगवेगळी मते आहेत. मात्र सर्वसाधारणपणे ते तीनवेळा आले असे मानले जाते. पहिल्यांदा १८९१ मध्ये, त्यानंतर खेतडीला जाताना अलवरला मुक्काम केला. तर शिकागोवरून परतल्यानंतरही स्वामीजी आले होते, असे सांगितले जाते.