नाशिक – विवाह हा साेपस्कार नसून संस्कार आहे. विवाहानंतरच्या जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर तडजाेड हा एकमेव उपाय असल्याचे प्रतिपादन आई फाऊंडेशनचे डाॅ. विनाेद काेतकर यांनी केले. विवाह संस्कृती परिवारातर्फे आयाेजित वधू-वर परिचय मेळाव्याप्रसंगी ते बाेलत हाेते.
यावेळी व्यासपीठावर इंदिरानगर मित्रमंडळाचे अध्यक्ष रमाकांत अलई, वाणी मित्रमंडळाचे माजी अध्यक्ष राजेश काेठावदे, उन्नती एज्युकेशन साेसायटीचे अध्यक्ष अशाेक साेनजे, नगरसेिवका रत्नमाला राणे आदी उपस्थित हाेते.
डाॅ. काेतकर पुढे म्हणाले की, गेल्या काही वर्षांचा आढावा घेतला तर घटस्फाेटीतांचा मेळावा घ्यावा लागताे, ही आपल्या समाजाची अधाेगती आहे. हे टाळायचे असेल तर लग्नानंतर पती-पत्नी, सासू-सासरे यांनी याेग्य वेळी दाेन पावले मागे घेण्याची तयारी दाखवणे गरजेचे आहे.
जीवनात सुखी व्हायचे असेल तर तुम्हाला तडजाेड स्वीकारण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. विवाह संस्कृतीच्या रेखा काेतकर यांनी आयाेजित केलेला मेळावा हे समाजासमाेर उत्तम उदाहरणे आहे. इतका माेठा कार्यक्रम महिला आयाेजित करू शकतात, हा माेठा आदर्श समाजासमाेर आहे. विवाह संस्कृती परिवाराने असेच सामािजक कार्यक्रम आयाेजित करून प्रबाेधनाचे कार्य सुरू ठेवावे, अशा शुभेच्छा त्यांनी यावेळी दिल्या.
याप्रसंगी राजेश काेठावदे यांनी विवाह संस्कृतीच्या प्रमुख रेखा काेतकर यांनी सुरू केलेला हा उपक्रम आगळावेगळा असल्याचे सांगितले. या मेळाव्यासाठी लागणारे अर्थसहाय्य जमले नाही तर त्या स्वत: त्याचा भार साेसतात, हा त्यांचा आदर्श घेण्यासारखा असल्याचे सांगितले. विवाह संस्कृतीच्या रेखा काेतकर यांनी आपल्या भाषणात सर्व समाज बांधवांचे सहकार्याबद्दल आभार मानले. या वधू-वर परिचय मेळाव्यात १३५ वधू-वरांनी सहभाग घेतला, याचा आमच्या परिवाराला आनंद आहे.
यापुढेदेखील समाजाने आमच्या पाठिशी खंबीरपणे उभे रहावे. विवाह संस्कृतीच्या माध्यमातून यापुढे देखील हे कार्य सुरू राहणार असून, या प्रवाहात जास्तीत जास्त समाजबांधवांनी सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. जितेंद्र काेठावदे यांनी प्रास्ताविकात विवाह संस्कृती परिवाराच्या आजवरच्या कार्याचा उहापाेह केला.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी कल्पेश दुसे, उषा कोठावदे, अतुल वाणी, सुभाष देव, जितेंद्र काेठावदे, अर्चना ब्राम्हणकर, नेहा कोठावदे, गीताजंली वरखेडे, सुनिता बाविस्कर, योगीता कोठावदे, वैशाली वाणी, दीिपका शिनकर, दीपाली महाजन, रुपाली कोठावदे, सुवर्णा कोठावदे, शंकर चिंचोले, दिलीप शिरुडे यांनी परिश्रम घेतले.