नाशिक – नाशिक तालुक्यातील विल्होळी गावच्या ग्रामपंचायत निवडणूक दरम्यान दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाली आहे. त्यामध्ये एका युवकाच्या डोक्याला जबर मार लागला असून कान रक्तबंबाळ झाल्याचे घटना घडली आहे. परंतु २४ तास उलटूनही अद्याप पर्यंत यासंदर्भात पोलिसांनी कोणतीही कारवाई केलेली नाही. दरम्यान जखमी युवकाच्या मित्रपरिवाराने या घटनेला पोलिस गांभीर्याने घेत नसल्याचा आरोप केला आहे. दुसरीकडे डीवायएसपी भीमाशंकर ढोले यांनी कार्यवाही सुरू असल्याचे सांगितले आहे.
जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुका वेगवेगळ्या कारणांनी गाजत आहेत. एकीकडे सरपंच पदाच्या निवडीसाठी लिलाव पद्धत तर दुसरीकडे बिनविरोध निवडणूक होत आहे. पण, तिसरीकडे निवडणूक प्रचारावरून तुंबळ हाणामारी होत असल्याचे नकारात्मक व सकारात्मक चित्र यानिमित्ताने बघायला मिळाले आहे.
गुन्हा दाखल करण्यास उशीर लावत आहे
घटना घडूनही पोलिसांनी त्याचे गांभीर्य दाखवले नाही. गुन्हा दाखल करण्यास उशीर लावत आहे. त्याचप्रमाणे मुख्य आरोपीस अटक केली जात नसल्याचे सांगितले.
नितीन भावनाथ, फिर्यदीचे मित्र
नितीन भावनाथ, फिर्यदीचे मित्र