मुंबई – माजी मुख्यमंत्री व विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची बाधा झाली आहे. तशी माहिती त्यांनीच ट्विट करुन दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून ते राज्यातील विविध भागात दौरे करीत होते. माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी कोरोना चाचणी करुन घ्यावी, असा सल्ला फडणवीस यांनी दिला आहे.