मनाली देवरे, नाशिक
……
यंदाच्या सीझनमध्ये अगदी पहिल्या सामन्यापासून कामगिरीत सातत्य राखणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाने शनिवारी राजस्थान रॉयल्सचा ८ गडी राखून पराभव केला. पहिल्या ३ सामन्यात मिळून अवघ्या १८ धावा करणाऱ्या विराट कोहलीला आज सूर गवसला, ही रॉयल चॅलेंजर्ससाठी आज आणखी एक आनंदाची बातमी ठरली. विराट आज ५३ चेंडूत ७२ धावा काढून नाबाद राहीला. देवदत्त पडीकल या सलामीच्या फलंदाजांने ६३ धावांची केलेली मजबूत खेळी राजस्थान रॉयल्स साठी डोकेदुखी ठरली.
त्याआधी आरसीबीच्या यजुर्वेंद्र चहल आणि मुळचा श्रीलंकन असलेल्या इसुरू उदाणा या गोलंदाजांनी आज राजस्थान रॉयल्स रॉयलच्या फलंदाजांना खेळपट्टीवर फार काळ उभे राहू दिलेच नाही. राजस्थान रॉयल्सच्या ताफ्यातले सगळे मुख्य फलंदाज आज अपयशी ठरले. महीपाल लोमरोर या नव्या दमाच्या अष्टपैलू खेळाडूने ४७ धावांची सर्वोच्च धावसंख्या राजस्थान राॕयल्सच्या डावात उभी केली केल्याने राजस्थान राॕयल्सला २० षटकात १५४ धावांचे एक माफक आव्हान तरी आरसीबी समोर उभे करता आले. या विजयानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघ गुणतक्त्यात पहिल्या क्रमांकावर आला आहे.