पुणे – प्रवास रद्द झाल्यानंतर विमान कंपन्या तिकीट बुकींगचे पैसे परत करीत नसल्याचा अनुभव सार्वत्रिक आहे. मात्र, लग्नासाठी बुकींग केलेली सेवा रद्द झाल्यानंतरही तब्बल २ लाख ८७ हजार रुपये परत न करणाऱ्या विमान कंपन्यांना एका महिलेने मोठाच दणका दिला आहे.
अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे पदाधिकारी विजय सागर यांनी दिलेल्या माहितीनुसार, लॉक डाऊनचे काळात चेन्नई येथे मुलाचे लग्न होते म्हणून एका महिला ग्राहकाने तीन विमान कंपनी चे पुणे ते चेन्नई असे ४५ लोकांची विमानाची तिकिटे बुक केली होती. कोरोना मुळे सर्व जगच ठप्प झाले आणि सदर लग्न कॅन्सल झाले. मुलगा आणि मुलगी ऑस्ट्रेलिया मध्ये होते त्यामुळे त्यांनी तिथे रजिस्टर लग्न केले पण विमान कंपनी ना सदर पुणे ते चेन्नई ची ४५ लोकांची तिकिटे परत करणे ची इच्छा नव्हती आणि लग्न कॅन्सल झाले मुळे ४५ लोकांना पुणे ते चेन्नई नेणें आणि आणणे हे एका महिला ग्रहकाला शक्य नव्हते. विमान कंपनी कडे २ लाख ८७ हजार रुपये अडकून होते आणि शासन दरबारी, विमान कंपनी कडे पत्र व्यवहार करून ही महिलेस न्याय मिळत नव्हता शेवटी अखिल भारतीय ग्राहक पंचायत त्यांचे मदतीस धावले आणि त्यांचे पैसे सुप्रीम कोर्टात जाऊन कमीत कमी वेळेत परत मिळवून दिले.
महिलेकडूनच ऐका ही पूर्ण कहाणी
आपणास पण काही समस्या आहेत का ?
मोफत मार्गदर्शन हवे असेल तर आपण अखिल भारतीय ग्राहक पंचायत कडे संपर्क करा.
*दर सोमवार,* *बुधवार, शुक्रवार*
*सायंकाळी ६ ते ७.३०*
विजय सागर(9422502315)
अध्यक्ष, अखिल भारतीय ग्राहक पंचायत
६३४, सदाशिव पेठ कुमठेकर रोड, गोळे कॉम्प्लेक्स,फडतरे चौक, पुणे ४११०३०
मार्गदर्शक:
श्री विलास लेले
9823132172
सौ अंजली देशमुख
9823135803
किशोर कुलकर्णी
8308325295
श्रीमती विजया वाघ
9075132920
श्री रवींद्र वाटवे
9422383785
श्रीमती राजश्री दीक्षित
9422318909
श्री रवींद्र सिन्हा, बाणेर
7774001188
श्री विश्वास चव्हाण,धानोरी
7769978484
श्री अरुण नायर,विश्रांतवाडी
9890652675
श्रीमती किशोरी रावळ, हडपसर
83909 02773