मुंबई – छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर हवाई गुप्तहेर विभागाने मोठी कारवाई करुन सोन्याची दहा तोळ्याची ग्रॅम वजनाची बिस्किटे जप्त केली आहेत. विभागाच्या अधिकाऱ्यांनी एतिहाद विमान क्र. ई वाय २०६ या विमानाची झडती घेतली. कोणाचाही दावा नसलेली सोन्याची बिस्किटे जप्त करण्यात आली.
जप्त केलेल्या वस्तूंमध्ये २४ लाख ५७ हजार ७९२ रुपये मूल्याची दावा नसलेली प्रत्येकी ५८२ ग्राम वजनाची २४ कॅरेट सोन्याची दहा तोळ्याची ५ बिस्किटे आणि अंदाजित एकूण वजन २५५४ ग्रॅम असलेले आणि २३५० ग्राम निव्वळ वजनाचे हे बिस्कीट आहेत. या बिस्कीटांची अंदाजित किंमत ९९ लाख २४ हजार ७३ आणि एकूण अंदाजित किंमत १ कोटी २३ लाख ८१ हजार ८६५ रुपयांचे सोने जप्त करण्यात आले. शौचालयात आरशाच्या मागे असलेल्या पत्र्यामागे हे सोने लपविण्यात आले होते .
सीमाशुल्क न भरता भारतात तस्करी करत सीमाशुल्क कायदा १९६२ चे उल्लंघन केल्याची खात्री पटल्यानंतर पंचनामा करून हे सोने जप्त करण्यात आले. या प्रकरणी पुढील तपास सुरु आहे.