वॉशिंग्टन – अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यात व्हिडिओमध्ये बायडेन विमानात चढताना तीन वेळा अडखळताना दिसत आहेत. तथापि, त्यांनी स्वत: ची काळजी घेतल्याने त्यांना कोणतीही इजा झाली नाही. यानंतर त्याच्या तब्येतीबद्दल प्रश्न निर्माण होऊ लागले. मात्र व्हाईट हाऊसने खुलासा केला की, वाऱ्याचा वेग जास्त असल्याने बायडेन यांचा तोल गेला.
राष्ट्राध्यक्ष जो बायडेन अटलांटा दौर्यावर असताना तेथे ते आशियाई-अमेरिकन समुदायाच्या नेत्यांसमवेत भेट घेणार होते. अटलांटाला रवाना होण्यासाठी एअर फोर्स वन विमानाच्या पायऱ्या चढत होते, तेव्हा त्याचा तोल ढासळला आणि ते पायर्यांवर पडले.
बायडेनबरोबर ही घटना एक नव्हे तर तीन वेळा घडली. यासंबंधी व्हायरल व्हिडिओत बायडेन विमानाच्या पायऱ्यावरून तीन वेळा खाली पडताना दिसत आहे. पडल्यानंतर ते हाताच्या मदतीने दोनदा उठले, परंतु तिसऱ्यांदा त्यांनी गुडघे टेकला. यानंतर, पायऱ्याची साइड रेलिंग धरून बायडेन कसेतरी वरती पोहोचले, त्यानंतर विमानात सोडले.
सदर व्हिडिओ आतापर्यंत बर्याच वेळा पाहिला गेला असून अनेक लोक राष्ट्रपतींच्या आरोग्याबद्दल चिंता व्यक्त करीत आहे. त्यामुळे त्यांच्या आरोग्याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. परंतु व्हाइट हाऊसच्या सूत्रांनी सांगितले की, बायडेन पूर्णपणे स्वस्थ आहेत. पायऱ्या चढताना वाऱ्याचा जोर खूप वेगवान होता. त्यामुळे कदाचित म्हणूनच ७८ वर्षीय जो बायन यांचे संतुलन बिघडले.
https://twitter.com/Breaking911/status/1372946685328957442