नाशिकरोड- मनेगेट पासून ते विभागीय महसूल आयुक्त कार्यालया कडे जाणारा रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे झाल्याने महाराष्ट्र नवनिर्माण् सेनेच्या वतीने खड्डावर प्रतिकात्मक आंदोलन करण्यात आले. या रस्त्यावर भारत प्रतिभूती मुद्रणालय, नाशिक, नगर, जळगाव, धुळे, नंदुरबार या पाच जिल्ह्यांचा कारभार पाहणाऱ्या विभागीय महसूल आयुक्त कार्यालय आहे. तसेच या कार्यालयाच्या आवारात शासनाचे विविध विभागाचे कार्यालय, तसेच शिक्षण उपसंचालक, परिसरात
सहाय्यक पोलीस आयुक्त, वाहतुक पोलीस, अन्न पुरवठा, कौटुंबिक न्यायालय, शिक्षण उपसंचालक, कृषी, माहिती व जनसंपर्क आदींसह पन्नास कार्यालये आहेत. या रस्त्यावर पाण्यातून दुचाकी चालवावी लागते तसेच पादचा-यांना चिखलातून वाट तुडवत चालत जावे लागते. हा रस्ता तातडीने दुरुस्तीची मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली आहे.
यावेळी नाशिकरोड विभाग अध्यक्ष विक्रम कदम, प्रकाश कोरडे, संतोष सहाणे, जिल्हा उपाध्यक्ष, नितीन पंडीत, शहर संघटक, प्रमोद साखरे, शशी चौधरी, नितिन धानपुने, विनायक पगारे, भाऊसाहेब ठाकरे उमेश भोई, मयुर कुक्डे, अदित्य कुलकर्णी, अमर जमधडे,गुड्डू शेख, अजिस सालन्स, बाळू साळवी आदि उपस्थितीत होते