नवी दिल्ली – महिलांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्यासाठी तसेच त्यांना व्यवसायात आत्मनिर्भर बनवण्यासाठी विविध योजना राबवल्या जात आहेत. शासनातर्फे योजना राबविण्यात येत असून आता यात बँकांनी देखील सहभाग घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर स्मॉल इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँकेतर्फे (सिडबी) अनोखी योजना राबवली जात आहे. ज्यात महिला उद्योजकांना व्यवसाय सुरू करण्यासाठी १० लाखांपर्यंत कर्ज दिले जात आहे. मुख्य म्हणजे यात कोणत्याही ग्यारंटी शिवाय तसेच कोणत्याही प्रकारच्या सिक्युरिटी शिवाय कर्ज दिले जात आहे.
उद्योग निधीतून मदत
स्मॉल इंडस्ट्रियल डेवलपमेंट बैंक तर्फे महिलांना उद्योग निधी अंतर्गत आर्थिक सहाय्य दिले जात आहे. याद्वारे घर बसल्या लहान व्यवसायाची सुरुवात केली जाऊ शकते. यासाठी बँकेतर्फे १० लाख रुपयांपर्यंत लोन दिले जात आहे. यासाठी कोणत्याही प्रकारच्या सिक्युरिटीची गरज नाही. योजनेद्वारे मिळणाऱ्या आर्थिक रकमेतून उत्पादन क्षेत्राशी निगडित लहान व्यवसाय सुरू करता येणार आहे. लोक घेतल्यावर १० वर्षाच्या आत परत करणे अनिवार्य असल्याचे बँकेने म्हटले आहे.
हे लक्षात घ्या
– लघु उद्योग सुरू करण्यासाठी महिला, एखाद्या संस्थेशी जोडलेल्या असणे आवश्यक आहे.
– व्यवसायात महिलांचा हक्क किमान ५१ टक्के असणे अनिवार्य आहे.
– किमान ५ लाख आणि कमाल १० लाख गुंतवणूक असलेल्या व्यवसायास प्राधान्य दिले जावे.
– देण्यात येणाऱ्या कर्जावरील व्याजदर संपूर्णपणे बँकेतर्फे ठरवले जाईल.
– नियमानुसार १ टक्के सर्व्हिस टॅक्स बँकेतर्फे आकारला जातो.
या व्यवसायांना मंजूरी
महिला उद्योग निधी योजनेअंतर्गत ब्यूटी पार्लर, सलून, शिवणकाम, शेतीतील उपकरणांची सेवा, हॉटेल किंवा रेस्टॉरंट, नर्सरी, ड्राई क्लीनिंग, केबल टीवी नेटवर्क, फोटोकॉपी (झेरॉक्स) सेंटर, प्रशिक्षण संस्था, वॉशिंग मशीन तसेच इतर इलेक्ट्रॉनिक आणि इलेक्ट्रिकल वस्तूंची दुरुस्ती अशा लघु उद्योगांसाठी कर्ज प्रक्रियेत मंजुरी देण्यात आली आहे.