मुंबई – विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दोन्ही सभागृहाचे कामकाज आज राष्ट्रगीताने संस्थगित करण्यात आले. यावेळी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यासह विधानसभा व विधान परिषद सदस्य उपस्थित होते.
कोरोना काळात अधिवेशन घेणं आव्हानात्मक होतं. महाराष्ट्र कधी थांबला नाही, महाराष्ट्र कधी थांबणार नाही या ब्रीदवाक्याला जागून अधिवेशनाचं कामकाज झालं, अर्थसंकल्पीय अधिवेशन संस्थिगित करत असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अधिवेशन संपल्यानंतर बातमीदारांशी बोलताना सांगितलं. तसंच पावसाळी अधिवेशन ५ जुलैपासून सुरु होणार असल्याचंही यावेळी घोषित करण्यात आलं.