मुंबई – महाराष्ट्र राज्य विधान परिषदेच्या शिक्षक, पदवीधर आणि धुळे- नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था प्राधिकारी संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मतदान सुरू झाले आहे. पुणे, नागपूर आणि औरंगाबाद विभागात पदवीधर मतदारसंघासाठी, पुणे आणि अमरावती विभाग शिक्षक मतदार संघासाठी तर धुळे- नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था प्राधिकारी संस्था मतदारसंघासाठी मतदान होत आहे.
या मतदानासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. सकाळी ८ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत मतदानासाठीची वेळ निश्चित करण्यात आली आहे. कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर होणारी ही पहिलीच निवडणूक असल्याने आरोग्यविषयक सर्व नियमांची काटेकोर अंमलबजावणी प्रत्येक मतदान केंद्रावरही केली जाणार असून यावेळी प्रथमच प्रत्येक मतदान केंद्रावर स्वतंत्र वैद्यकीय अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. सोशल डिस्टसिंग नियमांचे पालन करण्यासाठी आखणी करण्यात आली आहे.