रविवार, जून 22, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

विधानसभेचे पावसाळी अधिवेशन संस्थगित

by India Darpan
सप्टेंबर 9, 2020 | 12:08 pm
in राज्य
0
vidhan bhavan

मुंबई – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केवळ दोन दिवस कालावधी असलेलं विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन पुरवणी मागण्या मंजूर झाल्यानंतर आज संस्थगित करण्यात आले. पुढील अधिवेशन येत्या ७ डिसेंबरपासून नागपूर इथं घेण्याची शिफारस राज्यपालांना करण्यात आली आहे.

दोन्ही सभागृहात संमत विधेयके

  • सन २०२० चे विधानसभा विधेयक – महाराष्ट्र (द्वितीय पुरवणी) विनियोजन विधेयक, २०२० (वित्त विभाग) (पुर:स्थापित दि०९.२०२०, विधानसभेत संमत दि. ०८.०९.२०२०, विधानपरिषदेत संमत दि. ०८.०९.२०२०).
  • सन २०२० चे विधान परिषद विधेयक – महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्तव्यवस्था (सुधारणा) विधेयक, २०२० (विधि व न्याय विभाग) (धर्मादाय आयुक्त कार्यालयातील पूरक संवर्गातील अधीक्षक, जनसंपर्क अधिकारी किंवा विधि सहायक यांच्या पदोन्नतीच्या संधी उपलब्ध करण्याकरिता आवश्यक त्या सुधारणा करणेबाबत विधेयक). (पुर:स्थापित दि. ०७.०९.२०२०, विधानपरिषदेत विचारार्थ ०८.०९.२०२०, विधानपरिषदेत संमत दि. ०९.२०२०).
  • सन २०२० चे विधानसभा विधेयक – महाराष्ट्र  ग्राम पंचायत (दुसरी सुधारणा) विधेयक, २०२०, (ग्राम विकास विभाग) (पंचायतीच्या निवडणुका घेणे शक्य नसेल त्या ठिकाणी प्रशासकाची नियुक्ती करण्यासंदर्भातील तरतूद करणे) (सन २०२० चा महा. अध्या. क्र. 10 ) (पुर:स्थापणार्थ दि. ०७.०९.२०२०, विधानसभेत विचारार्थ ०८.०९.२०२०, विधानसभेत संमत दि. ०९.२०२०, विधानपरिषदेत संमत दि. ०८.०९.२०२०).
  • सन २०२० चे विधानसभा विधेयक –  महाराष्ट्र वस्तू व सेवा कर (सुधारणा) विधेयक, २०२०, (वित्त विभाग), (वस्तू व सेवा कर परिषदेच्या शिफारशीवरुन, दैवी आपत्तीमुळे ज्या कारवाया पूर्ण केल्या जाऊ  शकत नाही किंवा त्यांचे अनुपालन केले जाऊ शकत नाही अशा कारवायांच्या संबंधातील मुदत मर्यादा परिषदेच्या शिफारशींवरून, अधिसूचनेद्वारे वाढविता येईल शासनास अधिकार, अशी तरतूद करणे) (सन २०२० चा महा. अध्या. क्र. 8 ) (पुर:स्थापित दि. ०७.०९.२०२०, विधानसभेत विचारार्थ ०८.०९.२०२०, विधानसभेत संमत दि. ०९.२०२०, विधानपरिषदेत संमत दि. ०८.०९.२०२०).
  • सन २०२० चे विधानसभा विधेयक – महाराष्ट्र वस्तू व सेवा कर ( दुसरी सुधारणा) विधेयक, २०२०,  (वित्त विभाग) (केंद्रीय वस्तू व सेवा कर अधिनियम 2017 मध्ये करण्यात आलेल्या सुधारणांच्या अनुषंगाने,  राज्य अधिनियमामध्ये व केंद्रीय अधिनियम यांमध्ये एकरूपता व प्रयोज्यता राखण्याकरिता सुधारणा करणे) (सन २०२० चा महा. अध्या. क्र. 11 ) (पुर:स्थापित दि. ०७.०९.२०२०, विधानसभेत विचारार्थ ०८.०९.२०२० विधानसभेत संमत दि. ०९.२०२०, विधानपरिषदेत संमत दि. ०८.०९.२०२०).
  • सन २०२० चे विधानसभा विधेयक –  महाराष्ट्र राज्य व्यवसाय, व्यापार, आजिविका व नोकऱ्या यांवरील कर (सुधारणा)  विधेयक, २०२०, (वित्त विभाग), (सन २०२० चा महा. अध्या. क्र. 13 ) (कंपनी अधिनियम 2013 खाली नविन नोंदणी करतांना व्यवसाय करासाठी नोंदणी करण्याबाबत तरतुदी) (पुर:स्थापित दि. ०७.०९.२०२० विधानसभेत संमत दि. ०९.२०२०, विधानपरिषदेत संमत दि. ०८.०९.२०२०).
  • सन२०२० चे विधानसभा विधेयक – महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना (सुधारणा ) विधेयक, २०२० (नगर विकास विभाग) (सन २०२० चा महा. अध्या. क्र. 15) (महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, 1966 चे कलम 26 (1) मधील तिसऱ्या परंतुकातील (ii) च्या तरतुदींमध्ये विकास योजनेचा मसुदा तयार करण्याचा कालावधी महानगरपालिकांबरोबरच इतर नियेाजन प्राधिकरणे यांच्या बाबतीत देखील वाढण्याकरिता सुधारणा करण्यास तसेच कलम 148-अे मधील तरतुदीनुसारच्या विहित कालावधीतून, कोवीड-19 विषाणुच्या संदर्भातील केंद्र शासन तसेच राज्य शासनाने घोषित केलेला टाळेबंदीचा कालावधी वजा करणेबाबत) (पुर:स्थापित दि. ०७.०९.२०२०, विधानसभेत विचारार्थ ०८.०९.२०२०, विधानपरिषदेत संमत दि. ०९.२०२०).
  • सन २०२० चे विधानसभा विधेयक  –महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ (सुधारणा) विधेयक, २०२०, (उच्च व तंत्र शिक्षण विभाग) (नवीन महाविद्यालय तसेच नवीन अभ्यास पाठ्यक्रम इत्यादी सुरू करण्यासाठी मान्यता देण्याकरिता नियत करण्यात आलेला दिनांक, सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षासाठी वाढवून देणे) (सन २०२० चा महा. अध्या. क्र. 9 ) (पुर: स्थापित दि. ०७.०९.२०२०, विधानसभेत विचारार्थ ०८.०९.२०२०, विधानसभेत संमत दि. ०९.२०२०, विधानपरिषदेत संमत दि. ०८.०९.२०२०).
  • सन २०२० चे विधानसभा विधेयक –महाराष्ट्र सहकारी संस्था (दुसरी सुधारणा) विधेयक, २०२०, (सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग) (राज्यामध्ये कोरोना कोव्हिड विषाणूच्या सार्वत्रिक महामारीच्या साथीचा प्रसार झाल्यामुळे काही, ठराविक कालावधीत सहकारी संस्थांच्या समित्यांच्या निवडणुका घेणे शक्य नसल्याने, समित्या यथोचितरित्या घटित होईपर्यंत, सहकारी संस्थांच्या समित्यांच्या विद्यमान सदस्यांना नियमितपणे पदावर राहणे शक्य होण्याच्या आणि अशा समित्यांच्या निवडणुका पुढे ढकलण्याच्या दृष्टीने, कलमे ७३अअअ (३) व ७३कब यांमध्ये सुयोग्य सुधारणा करणे) (सन २०२० चा महा. अध्या. क्र. 12 ) (पुर:स्थापित दि. ०७.०९.२०२०, विधानसभेत विचारार्थ ०८.०९.२०२०, विधानसभेत संमत दि. ०९.२०२०, विधानपरिषदेत संमत दि. ०८.०९.२०२०).
  • सन 2019 चे विधानासभा विधेयक – भूमिसंपादन, पुनर्वसाहत करताना उचित भरपाईचा आणि पारदर्शकतेचा हक्क (महाराष्ट्र सुधारणा) विधेयक, २०२० (औद्योगीक विकासासाठी भूसंपादन करण्यासाठी सुलभता यावी याकरिता तरतूद) (वन विभाग) (पुर:स्थापित दि. ०७.०९.२०२०, विधानसभेत विचारार्थ ०८.०९.२०२०, विधानसभेत संमत दि. ०९.२०२०, विधानपरिषदेत संमत दि. ०८.०९.२०२०).
  • सन२०२० चे विधानसभा विधेयक – महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास (सुधारणा) विधेयक, २०२० (गृह निर्माण विभाग)  (मुंबईतील उपकर प्राप्त इमारतींच्या पुनर्विकासासंदर्भातील तरतुदींबाबत) (पुर:स्थापित दि. ०७.०९.२०२०, विधानसभेत विचारार्थ ०८.०९.२०२०, विधानसभेत संमत दि. ०९.२०२०, विधानपरिषदेत संमत दि. ०८.०९.२०२०).
  • सन२०२० चे विधानसभा विधेयक – महाराष्ट्र वेश्म मालकी (सुधारणा) विधेयक, २०२०, (गृहनिर्माण विभाग) (वेश्म मालकांच्या बहुमताच्या संमतीने प्रतिज्ञापनाच्या किंवा वेश्म विलेखाच्या तपशिलांमध्ये सुधारणा करण्यासंदर्भातील तरतुदींचा अंतर्भाव करणे तसेच तक्रार निवारण यंत्रणेबाबत तरतुदी करणे) (पुर:स्थापित दि. ०७.०९.२०२०, विधानसभेत विचारार्थ ०८.०९.२०२०, विधानसभेत संमत दि. ०९.२०२०, विधानपरिषदेत संमत दि. ०८.०९.२०२०).
  • सन २०२० चे विधानसभा विधेयक – महाराष्ट्र सहकारी संस्था (तिसरी सुधारणा) विधेयक, २०२०, (सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग), (महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, 1960 च्या कलम 73कअ चे पोट-कलम (3अ) मध्ये महाराष्ट्र सहकारी संस्था (सुधारणा) अधिनियम, 2016 नुसार केलेल्या सुधारणेतील “महाराष्ट्र सहकारी संस्था (सुधारणा) अधिनियम, 2016 याच्या प्रारंभाच्या दिनांकापूर्वी 10 वर्षाच्या कालावधीच्या आत कोणत्याही वेळी किंवा अशा प्रारंभानंतर कोणत्याही” हा मजकूर वगळणेबाबतची सुधारणा) (पुर:स्थापित दि. ०७.०९.२०२०, विधानसभेत विचारार्थ ०८.०९.२०२०).

 

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

जिल्ह्यात ८ हजार २७५ रुग्णांवर उपचार सुरू, ३७ हजार ७७ रुग्णांना डिस्चार्ज

Next Post

तोपर्यंत देवस्थाने खुली होणार नाहीत; राज्य सरकारचे प्रतिज्ञापत्र

Next Post
DpOD3kyUUAEjTXN

तोपर्यंत देवस्थाने खुली होणार नाहीत; राज्य सरकारचे प्रतिज्ञापत्र

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

cbi

सीबीआयने बिहार झारखंडमध्ये ७ ठिकाणी टाकले छापे…१०० कोटी बनावट जीएसटी रिफंडचे प्रकरण

जून 22, 2025
Gt ArXoXMAArHyz e1750556062941

शोलेत अमजद खान यांना सचिन पिळगावकर याने संवादफेक किवा डायलॉग फेकण्याची स्टाईल शिकवली…जितेंद्र आव्हाड यांची ही पोस्ट चर्चेत

जून 22, 2025
crime1

कारमधून आलेल्या कुटुंबियांनी लाकडी बॅट व लाठ्याकाठ्यांनी केली बेदम मारहाण…नेमकं घडलं काय

जून 22, 2025
Untitled 71

इस्राएलने केलेल्या हल्ल्यांमुळे अणु प्रदूषणाचा धोका…राफेल ग्रोसी

जून 22, 2025
WhatsApp Image 2025 06 21 at 17.17.54 1024x542 1

सहा रेडिओ जॉकींनी घेतलेल्या प्रकट मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी शिघ्र कविता करीत गाणेही गायले…

जून 22, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी बेकायदेशीर व्यवहार टाळावे, जाणून घ्या, रविवार, २२ जूनचे राशिभविष्य

जून 21, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011