शनिवार, जून 21, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

विधानसभा उपाध्यक्ष  नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते वनारे येथे विद्यार्थी वाचनालयाचा शुभारंभ

by India Darpan
सप्टेंबर 13, 2020 | 12:15 pm
in स्थानिक बातम्या
0
IMG 20200913 WA0029

दिंडोरी – वनारे ग्रामपंचायत येथे शाळा बंद- शिक्षण सुरू व गाव तेथे वाचनालय या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थी वाचनालयाचे उदघाटन विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ  यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड व प्राथमिक शिक्षणाधिकारी राजीव म्हसकर यांच्या संकल्पनेतून, तसेच दिंडोरी तालुक्याचे गट  शिक्षणाधिकारी भास्कर कनोज यांच्या प्रेरणेतून व मार्गदर्शनाखाली व कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पुजन व दीप प्रज्वलन करून करण्यात आले. मान्यवरांचे स्वागत पुष्पगुच्छ व श्रीफळ देऊन करण्यात आले.
शाळा बंद – शिक्षण सुरू या योजने अंतर्गत विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू नये यासाठी शिक्षण विभागामार्फत अनेक प्रकारचे उपक्रम राबवले जात आहे. त्याचाच  एक भाग म्हणून गाव तेथे वाचनालय या उपक्रमांतर्गत विद्यार्थी वाचनालय सुरू करण्यात आले आहे. याचा विद्यार्थी व सुशिक्षित तरूण वर्गांने  लाभ  घ्यावा, असे आवाहन विधानसभा  उपाध्यक्ष  नरहरी झिरवाळ यांनी केले.
यावेळी वाचनालयाची संकल्पना विधानसभा उपाध्यक्ष यांना आवडल्याने, त्यांनी वाचनालयासाठी त्याच ठिकाणी २१ हजार रुपये पुस्तके घेण्यासाठी रोख स्वरुपात शाळेतील शिक्षकांकडे सुपूर्द केले.चौदाव्या वित्त आयोग निधी मधून ई लर्नींग साहित्य अंतर्गत ग्रामपंचायत वनारे मार्फत शाळेस  सोनी कंपनीचा स्मार्ट टीव्ही किमंत १ लाख २४ हजार ९९९  व सोनी कंपनीचा साऊंड सिस्टीम किंमत ६८ हजार ९९० रुपये  शाळेस भेट दिले. तसेच जिल्हा परिषद शाळा खुंटीचापाडा यांना सोनी कंपनीचा साऊंड सिस्टीम रु. ६८ हजार ९९० रुपयाचे  भेट देण्यात आले.
यावेळी देवसाने येथील  शिक्षण विस्तार अधिकारी के. पी. सोनार, पिंपळपाडा येथील केंद्र प्रमुख आर. के. धात्रक यांनी विद्यार्थी वाचनालयासाठी ५० पुस्तकांचे संच भेट दिले. शाळेतील शिक्षकांनी मुलांना अभ्यासासाठी प्रत्येकी एक वही भेट देण्यात आली. या वेळी दिंडोरीचे गटशिक्षणाधिकारी बी.डी.कनोज,वनारे गावचे सरपंच दिपक झिरवाळ , शाळाव्यवस्थापन  समितीचे अध्यक्ष प्रकाश मुरलीधर झिरवाळ शिक्षण विस्ताराधिकारी एस. पी. पगार ,शिक्षण विस्ताराधिकारी के. पी. सोनार,केंद्रप्रमुख आर. के. धात्रक , ग्रामसेवक जेट्टे  , मुख्याध्यापक संदिप  चौधरी, दिनेश यशवंत सहारे, गीता महादू गावीत, रामदास अनाजी कराटे शाळा धोंडाळपाडा, यादव पांडुरंग खांडवी शाळा खुंटीचापाडा, सोनवणे वारे, कावेरी नामदेव भोये, जयश्री किसन पालवी शाळा भनवड आदी शिक्षक उपस्थित होते. तसेच ग्रामस्थ मधुकर झिरवाळ, नवनाथ झिरवाळ, रमेश झिरवाळ, मोहन पाटील, अशोक भोये, विनोद झिरवाळ, प्रकाश झिरवाळ, अरुण गायकवाड, आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी स्वयंसेवक विनोद झिरवाळ, योगेश झिरवाळ, भरत भोये यांचा शाळेचा वतीने सत्कार करण्यात आला. या अगोदर ग्रामपंचायत मार्फत रस्त्याच्या दुतर्फा नारळ, सुपारी,जांभूळ  आदी ३२० वृक्षाचे वृक्षारोपण झिरवाळ यांच्या हस्ते करण्यात आले.

 

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

वाह ! लॉकडाऊनमधली सांयकाळची शाळा;आदिवासी पाड्यांवर ज्ञानदान

Next Post

मराठा आरक्षण बैठकीत गोंधळ; आमदार फरांदेंना रोखले

Next Post
प्रातिनिधीक फोटो

मराठा आरक्षण बैठकीत गोंधळ; आमदार फरांदेंना रोखले

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी बेकायदेशीर व्यवहार टाळावे, जाणून घ्या, रविवार, २२ जूनचे राशिभविष्य

जून 21, 2025
aditya thackeray e1703150861580

कुठल्याही भाषेला विरोध नाही…आदित्य ठाकरे यांची सोशल मीडियावर केली ही पोस्ट

जून 21, 2025
crime1

वाहनचोरीचे सत्र सुरूच…वेगवेगळया भागातून तीन मोटारसायकली चोरीला…

जून 21, 2025
Oplus_0

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रकट मुलाखत सरस प्रश्नांने रंगली…

जून 21, 2025
Untitled 70

नाट्य आणि चित्रपट अभिनेता तुषार घाडीगावकर याची आत्महत्या…

जून 21, 2025
crime 13

धक्कादायक…बाल्कनीत साठलेल्या पाण्याच्या वादातून लोटून दिल्याने एकाचा मृत्यू

जून 21, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011