दिंडोरी – विधानसभा उपसभापती नरहरी झिरवाळ यांच्या मुंबई कार्यालयातील एक कर्मचारी कोरोनाबाधित झाल्याने कार्यालय बंद करण्यात आले आहे. तसेच, खबरदारीसाठी झिरवाळ हे आठ दिवस होम क्वारंटाइन राहणार आहेत. जनतेस भेटणार नाही पण माझे कार्यालय व कामकाज सुरुच राहील, असे झिरवाळ यांनी स्पष्ट केले आहे. नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी व कोणतीही अडचण असल्यास स्वीय सहाय्यक धनराज भट्टड (मो.- 9689345144) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन झिरवाळ यांनी केले आहे.