नाशिक – राज्यपालांनी विधानपरिषदेच्या १२ सदस्यांचा प्रस्ताव मान्य न केल्यास सुप्रीम कोर्टापर्यंत जावे लागेल असे विधान राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी नाशिक येथे केले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या विभागीय वार्षिक आढावा बैठकीसाठी ते नाशिकला आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, सरकारने दिलेल्या प्रस्तावाला राज्यपालांनी ताबडतोब मंजूरी द्यायला हवी किंवा रिजेक्ट तरी करावे म्हणजे कोर्टात तरी जाता येईल. यावेळी ते म्हणाले की, राज्यातल्या सत्ताधारी पक्षाच्या माध्यमातून जे निर्णय होतात, त्या निर्णयाला मंजुरी देणे नियम आणि घटनेनुसार राज्यपालांना बंधनकारक आहे.