नाशिक: नाशिक शहरात संविधान सन्मानार्थ १५ वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन आगामी काळात कोरनाचे सावट संपल्यावर मराठा विद्या प्रसारक संस्थेत केटीएचएम महाविद्यालयाच्या आवारात होणार आहे. साहित्याच्या विविध प्रवाहाचा विचार समजून घेण्यासाठी. दोन दिवसीय होणाऱ्या साहित्य संमेलन यशस्वी होण्यासाठी प्राध्यापकनी नियोजनात जबाबदारी स्वीकारून भागीदारी करावी. या आधी झालेल्या साहित्य संमेलनाचा आपल्याला अनुभव आहे. त्यामुळे नक्कीच अधिक प्रमाणात चांगले नियोजन करता येईल . असे आवाहन केटीएचएमच्या प्राध्यापक बैठकीत प्राचार्य डॉ. व्ही. बी. गायकवाड यांनी केले.
या प्रसंगी विचारमंचावर संविधान सन्मानार्थ १५ वे साहीत्य संमेलनचे मुख्य संयोजक राजू देसले, विद्रोही चळवळ चे संघटक किशोर ढमाले, स्वागताध्यक्ष शशिकांत उन्हवणे, संयोजक नितीन मते आदी उपस्थित होते.
या प्रसंगी किशोर ढमाले यांनी विद्रोही सांस्कृतिक चळवळची भूमिका विशद केली. महात्मा फुले यांच्या साहित्य विषयी भूमिकेवर राज्यभर १५ साहित्य संमेलन झाली आहेत. १५ वे संविधान सन्मानार्थ विद्रोही साहित्य संमेलन नाशिक येथे ऐतिहासिक वारसा असलेल्या मविप्र संस्थेच्या प्रांगणात होणार आहे . सत्यशोधक समाजाच्या चळवळीचा वारसा असलेल्या मविप्र संस्थेत राजश्री शाहू महाराज यांनी भेट दिली होती. या घटनेस १५ एप्रिल २०२१ रोजी १०१ वर्ष पूर्ण होत आहेत . या ऐतिहासिक घटनेचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. विद्रोही साहित्य संमेलन भारतीय संविधान, फुले, शाहू महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित आहे. साहीत्य संमेलन त उपस्थित असणाऱ्या साहीत्य प्रेमींना सहभागी करून घेण्यासाठी १२ विषयावर गट चर्चा करण्यात येणार आहेत. समकालीन विषयावर परिसंवाद, निमंत्रित कवी संमेलन, खुले कविसंमेलन, बालमंच, शाहिरी जलसा, चित्र प्रदर्शन, शेतकरी दिल्ली आंदोलन , संविधान वर विशेष व्याख्यान व चर्चा होणार आहे. साहित्य संमेलनची तयारी कोरोनाचे नियम पाळून सुरूच असणार आहे. ३० समित्या करण्यात आल्या आहेत नियोजनसाठी यात आपण स्वतःच्या आवडीच्या समितीत सहभागी व्हावे असे आवाहन केले.
राजू देसले यांनी, संमेलन साठी १ मूठ धान्य व १ रु मोहीम सुरू आहे. जनतेच्या पैशातून साहित्य संमेलन व्हावे ही भूमिका आहे. जमा होणारे धान्य व निधी संमेलन साठी वापरला जाईल. उरलेला निधी व धान्य गुरुद्वारा द्वारे दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला मदत म्हणून पाठवला जाणार आहे. शाहू महाराज व सत्यशोधक चळवळ वारसा असलेला ठिकाणी साहित्य संमेलन व कोल्हापूरचे डॉ आनंद पाटील जे रयत शिक्षण संस्थेच्या कमवा शिका योजनेतून शिकलेले आहेत. ते डॉ पाटील साहित्य संमेलनालाअध्यक्ष लाभलेले आहेत. या ऐतिहासिक साहित्य संमेलनात सहभागी होऊन नियोजन त मदत करावी ;असे आवाहन राजू देसले यांनी केले .
बैठकीस उपप्रचार्य डॉ. पी व्ही कोटमे, प्रा माधुरी मोगल, डॉ संजय साळवे, डॉ दिलीप पवार, आरती मंत्री, प्राची पिसोळकर, डॉ अमोल गायकवाड, डी एच शिंदे, मोहन पवार, डॉ के एम आहिरे, सुवर्णा धामणे, सतीश कोटेकर, के एम अहिरे, आदी प्राध्यापक व विविध विषयाचे विभाग प्रमुख उपस्थित होते प्रा दिलीप पवार यांनी आभार व्यक्त केले.