नाशिक – येत्या २५ आणि २६ मार्चला होणाऱ्या पंधराव्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. आनंद पाटील यांची निवड झाली आहे. डॉ. आनंद पाटील हे आशियातले एक आघाडीचे सांस्कृतिक तुलनाकार मानले जातात.
वैचारिक, ललित, प्रवासवर्णन, कथा, नाटक इत्यादि सर्व पद्धतीचे लेखन करून त्यांनी मराठी, ग्रामीण व इंग्रजी साहित्यात मोलाची भर घातली आहे. कागूद’ आणि ’सावली’ या त्यांच्या दोन लघुकादंबर्याम गाजल्या आहेत.
नाशिकमध्ये केटीएचएम महाविद्यालयाच्या आवारात होत असलेल्या या संमेलनात विविध विषयांवर परीसंवाद होणार आहेत, असं विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या महाराष्ट्राच्या अध्यक्ष प्रा. प्रतिमा परदेशी आणि स्वागताध्यक्ष शशीभाऊ उन्हावणे, मुख्य संयोजक राजू देसले यांनी सांगितले.