नाशिक – महावितरणच्या ग्राहकांना दर्जेदार व अखंडित वीज पुरवठा मिळावा सोबतच सर्वच वर्गवारीतील लघु व उच्च दाबाच्या नवीन विद्युत जोडण्याची प्रकरणे ज्येष्ठता यादीप्रमाणेच जोडणी देण्यात यावी, वीज जोडणी झिरो पेंडन्सी करिता सकारात्मक दृष्टिकोन बाळगून गरजेनुसार आराखडा तयार करण्याचे निर्देश महावितरणच्या कोकण प्रादेशिक विभागाचे सह व्यवस्थापकीय संचालक गोविंद बोडके (भाप्रसे) यांनी दिले. मंगळवारी महावितरणच्या जेलरोड वरील ऊर्जा व्यवस्थापन आणि प्रशिक्षण संस्थेच्या सभागृहात आयोजित बैठकीत नाशिक, मालेगाव व अहमदनगर मंडळाचा विषयनिहाय विविध कार्याचा आढावा घेतला, यावेळी ते बोलत होते.
महावितरणच्या ग्राहकांना अखंडित व गतीमान सेवा देण्याबरोबरचं कृषीपंप वीज जोडणी धोरण २०२० संदर्भात महाराष्ट्र शासनाने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी काटेकोर आणि प्राथमिकतेने करून ही योजना यशस्वी करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. या संदर्भात उपस्थितांशी विस्तृत चर्चा करून या योजनेसंदर्भातील माहिती, अडचणी शंका जाणून घेऊन या धोरणाची माहिती सर्वत्र पोहचावी असे प्रतिपादन त्यांनी केले.
विभागांना सहाय्य करण्यासाठी कंत्राटी पद्धतीवर देण्यात आलेले मनुष्यबळ यांचा पूर्ण क्षमतेने वापर करावा, यावेळी अनेक विषयावर त्यांनी विस्तृतपणे आढावा घेऊन कृषीपंप ग्राहकांचा सर्व्हे संदर्भात सुद्धा त्यांनी विभागनिहाय माहिती घेतली. अनेक ग्राहकांचा पुरवठा वीजदेयके न भरल्यामुळे कायमस्वरूपी खंडित करण्यात आला आहे, अशा जागेवर जोडणी दिल्या जाणार नाही यासाठी दक्ष राहण्याबरोबर जेग्राहक ज्या कारणासाठी जोडणी घेतली त्याव्यतिरिक्त इतर कारणासाठी वापर करताना आढळल्यास संबधीतावर नियमाप्रमाणे कारवाई करण्याचे आदेशही दिले. यासह ग्राहकांच्या अडचणीचे तात्काळ निवारण करण्याचे सहव्यवस्थापकीय संचालक गोविंद बोडके यांनी आदेशित केले.
सहव्यवस्थापकीय संचालक गोविंद बोडके यांचे आज नाशिक परिमंडळात प्रथम आगमनानिमित्त मुख्य अभियंता रंजना पगारे यांचेसह संघटना व अधिकारी कर्मचारी यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. बैठकीला मुख्य अभियंता रंजना पगारे, प्रादेशिक विभागाचे महाव्यवस्थापक अनिल बराटे आणि योगेश खैरनार, अधिक्षक अभियंते प्रविण दरोली, रमेश सानप, संतोष सांगळे व संजय खंडारे तसेच कार्यकारी अभियंते धनंजय आहेर, राजाराम डोंगरे, धनंजय दीक्षित, माणिकलाल तपासे, जयंतीलाल भामरे, सतीश बोन्डे , संजय तडवी, सुरेंद्रनाथ भोये, नितीन धर्माधिकारी, दत्तात्रय गोसावी, निलेश चालिकवार, प्रभारी सहाय्यक महाव्यवस्थापक (विवले) राजा बोढारे, प्रणाली विश्लेषक आर बी सोनवणे, वरिष्ठ व्यवस्थापक(विवले) दिनकर मंडलिक, आर एस. कुमावत, ललित खाडे आदी अधिकारीबैठकीस उपस्थित होते.