नाशिक – सद्यस्थितीचा विचार करता विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या मनात त्यांच्या नोकरी आणि व्यवसाय बद्दल खूप शंका असतात, त्यातला महत्वाचा प्रश्न म्हणजे अभियांत्रकीची कोणती शाखा निवडायची आणि कोणत्या शाखेची व्याप्ती जास्त असेल. कोणत्या शाखेला भविष्यात जास्तीत जास्त नोकरीच्या संधी मिळतील असे बरेच काही.
तुमच्या ह्या सगळ्या प्रश्नांचं समाधान करण्यासाठी क. का. वाघ अभियांत्रिकेच्या “विद्युत विभागाने विद्युत अभियांत्रिकी क्षेत्रातील नोकरी मधील वाढत्या संधी” या विषयावर व्याख्यान आयोजित केले आहे. ह्या व्याख्यानाचे मार्गदर्शक आहेत डॉ विश्राम बापट (डायरेक्टर ECE (India) Energies Private Limited, अमरावती), विद्युत अभियांत्रिकी क्षेत्रात त्यांचा अभ्यास प्रगल्भ आहे. डॉ बापट ह्यांनी सिंहगड इन्स्टिटयूट ऑफ टेकनॉलॉजि लोणावळा येथे ६ वर्ष HOD म्हणून काम पाहिले, तसेच GITAM झज्जर हरियाणा येथे डायरेक्टर म्हणून ३ वर्ष, कॉलेज ऑफ इंजिनीरिंग मिरज, अण्णासाहेब डांगे कॉलजे ऑफ इंजिनीरिंग सांगली येथे प्रिन्सिपॉल म्हणून, तर वालचंद कॉलेज ऑफ इंजिनीरिंग येथे प्रोफेसर म्हणून २१ वर्ष काम पाहिल. डॉ बापट ह्यांचा विविध क्षेत्रातला अनुभव विद्यार्थ्यां साठी उपयोगाचा ठरेल हे व्याख्यान २६ नोव्हेंबर रोजी दुपारी २.०० वाजता झूम वर ऑनलाईन पद्धतीने आयोजित केले आहे.
या ऑनलाईन मीटिंग चा तपशील विद्युत विभागाचे टेलिग्राम चॅनेल https://t.me/eekkwieer वर कळवण्यात येईल. अभियांत्रिकीला प्रवेश घेणाऱ्या सर्व इच्छुक विद्यार्थ्यांनी व पालकांनी या व्याख्यानाचा लाभ घ्यावा असे आवाहन क. का वाघ अभियांत्रिकेचे प्राचार्य डॉ. केशव नांदुरकर व विद्युत विभागाचे प्रमुख डॉ. बन्सीधर कुशारे व डॉ रवींद्र मुंजे यांनी केले आहे.