नाशिक – अभियांत्रिकीची प्रवेश परीक्षा एमएचटी सीईटी 2020 (MHT CET 2020) झाली आहे. शासनाने ठरवून दिलेल्या वेळेत या परीक्षेचा निकाल जाहीर होईल व अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया चालू होईल. तत्पूर्वी पालकांच्या व अभियांत्रिकीला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मनात बरेच प्रश्न असतात. त्यातला महत्वाचा प्रश्न म्हणजे यांत्रिकीची कोणती शाखा निवडायची आणि कोणत्या शाखेची व्याप्ती जास्त असेल. अभियांत्रिकीच्या सर्वच शाखा आपली महत्वपूर्ण भूमिका बजावत असताना, विद्युत अभियांत्रिकीचे महत्व अधोरेखित करण्यासाठी क. का. वाघ अभियांत्रिकेच्या विद्युत विभागाने ‘विद्युत अभियांत्रिकी क्षेत्रातील संधी’ या विषयावर व्याख्यान आयोजित केले आहे. या व्याख्यानाच्या मार्गदर्शिका आहेत सौ. अश्विनी घायाळ चिटणीस. सौ अश्विनी ह्या विद्युत क्षेत्रातील स्वतंत्र संशोधक व धोरण विश्लेषक म्हणून मागील १८ वर्षांपासून काम करीत आहेत. त्या क का. वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी आहेत. हे व्याख्यान शनिवारी २४ ऑक्टोबरला दुपारी ३.३० वाजता ऑनलाईन पद्धतीने आयोजित केले आहे. या ऑनलाईन मीटिंग चा तपशील खाली दिलेला आहे. अभियांत्रिकीला प्रवेश घेणाऱ्या सर्व इच्छुक विद्यार्थ्यांनी व पालकांनी या व्याख्यानाचा लाभ घ्यावा असे आवाहन क. का वाघ अभियांत्रिकेचे प्राचार्य डॉ. केशव नांदुरकर व विद्युत विभागाचे प्रमुख डॉ. बन्सीधर कुशारे व डॉ रवींद्र मुंजे यांनी केले आले.
व्याख्यानाचा लाभ घेण्यासाठी
Online Platform: Zoom Meeting
Meeting ID: 971 8244 9952
Passcode: 8Fw5GR