मुंबई – बॉलीवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक म्हणजे विद्या बालन हिची स्वतःचा असा मोठा चाहता वर्ग आहे. ‘लगे रहो मुन्ना भाई’, ‘भुल भुलैया’, ‘परिणीता’, ‘द डर्टी पिक्चर’ ह्यांसाख्या सुपर हिट चित्रपटातून विद्याच्या अष्टपैलू अभिनयाचं खूप कौतुक झालेलं आहे. मात्र फार कमी लोकांना हे माहिती असेल की विद्या बालन ची चुलत बहिण प्रियामणी ही दक्षिण भारतीय चित्रपट सृष्टीतील एक आघाडीची अभिनेत्री असून तिने शाहरुख खान पासून ते मनोज बाजपेयी पर्यंत अनेक अभिनेत्यांबरोबर काम केले आहे.
दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीत प्रियामणि हे खूप मोठं नाव आहे. ४ जून १९८४ मध्ये बंगलोर येथे जन्मलेल्या प्रियामणीच्या वडिलाचे नाव आहे वासुदेव मणी अय्यर आणि आईचे नाव आहे लता अय्यर. अभिनय हा तिला वारसा हक्काने मिळाला नसून स्वतःच्या प्रतिभेच्या जोरावर तिने आपली वेगळी ओळख बनवली आहे.
प्रियामणिने आपल्या करियरची सुरुवात तेलूगू चित्रपट Evare Atagaadu ने केली होती. यानंतर तिने मल्याळम चित्रपट सत्यम मध्ये भूमिका केली. हा चित्रपट फ्लॉप झाला असला तरीसुद्धा या चित्रपटाने प्रियामणी साठी तामिळ चित्रसृष्टीचे दरवाजे उघडले. वर्ष २००७ मध्ये प्रियामणीचं नशीब चमकलं आणि तिचा ‘पारुतीवीरन’ नावाचा चित्रपट सुपरहिट झाला. या चित्रपटासाठी तिला राष्ट्रीय पुस्कारांसाठी नामांकन सुद्धा मिळालं.
प्रियामणिने बॉलीवुड मध्ये सुद्धा काम केलेलं आहे. मणिरत्नमच्या ‘रावण’ मधून तिने बॉलीवुड चा डेब्यू केला. याशिवाय रक्त चरित्र चित्रपटातसुद्धा प्रियामणी दिसली होती. वर्ष २०१३ मध्ये प्रियामणिने पुन्हा एकदा बॉलीवुड मध्ये एन्ट्री केली आणि चेन्नई एक्सप्रेस चित्रपटातील ‘वन टू थ्री फोर’ या गाण्यामध्ये शाहरुख खान बरोबर जबरदस्त नृत्य केले. लवकरच ती अजय देवगन च्या मैदान चित्रपटात दिसून येणार आहे.