नाशिक – विभागातील सर्व जिल्ह्यातील महाविद्यालयांनी आणि विद्यार्थ्यांनी महाडीबीटी या संकेतस्थळावर शिष्यवृत्तीसाठी अर्ज भरण्याचे आवाहन समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त भगवान वीर यांनी केले आहे.
नाशिक विभागातील सर्व महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जाती, विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षाकरीता शिष्यवृत्ती, शिक्षण फी व परीक्षा फी, राजश्री शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती, निर्वाह भत्ता इ. योजनांचे ऑनलाईन अर्ज भरायचे आहेत. त्यासाठी महाडिबीटी पोर्टल ३ डिसेंबर पासून सुरू झाले आहे. त्या अनुषंगाने सर्व महाविद्यालयांनी अनुसूचित जाती, विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील नविन प्रवेशित (Fresh) व नुतनीकरण (Renewal) महाडीबीटी प्रणालीमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्याकरीता विद्यार्थ्यांना आपल्या स्तरावरुन सूचना द्याव्यात.
महाविद्यालयांनी त्यांचे स्तरावर प्राप्त अर्जाची पडताळणी करुन परिपूर्ण पात्र अर्ज संबंधित जिल्हयाचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण लॉगिनला ३१ मार्च पर्यंत ऑनलाईन पद्धतीने पाठवावेत. विहीत कालावधीत शिष्यवृत्तीचे अर्ज सादर न केल्यास त्याबाबतची सर्वस्वी जबाबादारी ही संबंधित महाविद्यालयांची राहील, असे आवाहन वीर यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा