चांदवड- पंचायत समितीच्या शिक्षण विभागाच्यावतीने मासिक सभेत विद्यार्थ्यांना ल्मार्ट मोबाईल शिक्षणासाठी उपलब्ध करुन देण्यात आले. त्याचा विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी फायदा होणार आहे.
कोरोनामुळे प्रत्यक्ष शाळा भरत नसल्याने विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण घ्यावे लागत आहे. तर, दुर्गम भागात शिक्षकांना प्रत्यक्ष विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन शिक्षण द्यावे लागत आहे. परंतु काही गरीब विद्यार्थ्यांकडे ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईल किंवा अन्य साधन नसल्याने अशा विद्यार्थ्यांसाठी जिल्हा परिषदेने डोनेट फॉर डिवाइस हीअनोखी मोहिम हाती घेतली आहे. त्याअंतर्गत तालुक्यातील काही गरजू विद्यार्थ्यांना स्मार्ट डिव्हाईस उपलब्ध करुन देण्यात आले.
चांदवडचे गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, प्रभारी केंद्र प्रमुख यांनी स्व खर्चाने काही डिव्हाईस जमा करून ते पंचायत समिती पदाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केले. कार्यक्रमाप्रसंगी सभापती धाकराव, सदस्य नितीन गांगुर्डे, निर्मला आहेर, गट विकास अधिकारी पाटील हे उपस्थित होते.