नाशिक- येथील आशा ग्रुप संचालित पारख क्लासेस द्वारे विद्यार्थी व त्यांच्या पालकांसाठी दोन दिवसीय
ऑनलाइन कार्यशाळेचे आयोजन केले आहे. शनिवार दिनांक 21 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 7.45 वाजता नाशिक मधील सुप्रसिद्ध सूत्रसंचालक व मुलाखतकार शिल्पा भेंडे या आपल्या वक्तृत्वाने सभा कशी जिंकावी याबद्दल मार्गदर्शन करतील. तर रविवारी दिनांक 22 नोव्हेंबर सकाळी 9 वाजता हास्य योगा याविषयी सुप्रसिद्ध हास्य तज्ञ
डॉ सुषमा दुगड या मार्गदर्शन करतील. रविवारी सायंकाळी 7.45 वाजता मराठी व हिंदी चित्रपटात आपल्या अभिनयाने ठसा उमटवणारी व पारख क्लासेसची माजी विद्यार्थिनी अभिनेत्री निवेदिता पगार ही अभिनय व नृत्य या विषयी मार्गदर्शन करणार आहे. या कार्यशाळेचे उद्घाटन मिसेस ग्लोबल युनायटेड लाईफ टाईम क्वीन डॉ नमिता कोहक यांच्या हस्ते होईल. या सर्व मुलाखती प्रा सीए लोकेश पारख हे घेतील. झूम आयडी 718 848 1830 पासकोड पारख यावर तसेच फेसबुक पेज सीए लोकेश पारख क्लासेस व यूट्यूब चॅनल पारख क्लासेस यावर लाभ घेता येईल. सर्वांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन संचालिका आशा व सपना पारख यांनी केले आहे.