मुंबई – अखिल भारतीय मराठी विज्ञान परिषदेतर्फे यंदा १३ ते १७ डिसेंबर २०२० रोजी अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. यंदाचे पंचावन्न अधिवेश असून कोरोनाचा वाढता पादुर्भाव लक्षात घेता हे अधिवेशन ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. सीएसआयआर, नवी दिल्लीचे महासंचालक डॉ. शेखर मांडे अध्यक्षपद भूषवणार आहेत. ‘लसनिर्मिती’ या विषयवार ते मार्गदर्शन करणार आहेत. त्याशिवाय महिला अभियंत्यांचे अनुभव यावर परिसंवाद, विद्यार्थ्यांसाठी प्रयोग व देशी परदेशी म्युझियम्सना आभासी भेटी असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. अधिवेशनात सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी अधिवेशनासाठी मराठी विज्ञान परिषदेच्या office@mavipamumbai.org या ईमेलआयडीवर संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.