१६ डिसेंबर हा दिवस संपूर्ण भारतात विजय दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचे औचित्य साधून एक अभिनव संकल्पना आम्ही नाशिक शहरामध्ये घेऊन येत आहोत. १६ डिसेंबर २०२० रोजी विजय दिवस साजरा करत असताना अभिमान वाटतो की यावर्षी आपण विजय दिवसाच्या पन्नासाव्या वर्षात पदार्पण करीत आहोत, या निमित्ताने ५० जणं एकत्र येऊन १२ सूर्यनमस्कार घालून भारतीय जवानांना एक अनोखी मानवंदना आम्ही देणार आहोत. या कार्यक्रमात नाशिक शहरातील नागरिकांना आम्ही असे आवाहन करू इच्छितो की या अभिनव उपक्रमात आपण देखील सहभागी होऊ शकता.
या साठी तुम्ही काय कराल? (नागरिकांना आवाहन)
१. नावनोंदणी आवश्यक
२. नावनोंदणी साठी संपर्क ८३२९०१५०९०
३. तुमच्या Email ID वर लाईव्ह कार्यक्रमाची लिंक येईल. त्या लिंकवर क्लिक करून आपण १६ डिसेंबर २०२० रोजी सकाळी ७ ते ८ घरबसल्या तुम्ही कार्यक्रमात थेट सहभागी होऊ शकता
४. तुम्हाला समोर लॅपटॉप अथवा मोबाइल ठेऊन १२ सूर्यनमस्कार घालायचे आहेत, तेही घरात राहून
५. आपल्या भारतमातेच्या रक्षणार्थ सीमेवरील जवानांना सलामी देण्यासाठी या उपक्रमात नक्की सहभागी व्हा
या संकल्पनेला मूर्त रूप देणेसाठी आपल्यासारख्या सशक्त व्यासपीठाचा आम्हाला सहभाग मिळाला तर आम्ही ही स्तुत्य संकल्पना घराघरात पोहचवू शकतो याची आम्हाला खात्री आहे. आपल्या माध्यमातून शक्य तेवढी जास्त प्रसिद्धी आपण या उपक्रमास द्यावी अशी आपणास नम्र विनंती. या कार्यक्रमास आपण आपला एखादा प्रतिनिधी पाठवावा ही देखील आपणांस विनंती.
कार्यक्रमाची तारीख : १६ डिसेंबर २०२०
वेळ : सकाळी ७ वाजता.
स्थळ: Full Toss Turf निर्मला कॉन्व्हेंट रोड, आकाशवाणी जवळ, नाशिक
आयोजक
प्रथमेश इनामदार, संचालक, इलान एन्टरटेन्मेंटस