वॉशिंग्टन – अमेरिकेचे नवनियुक्त अध्यक्ष जो बायडेन आणि उपराष्ट्रपतीपदी निवड झालेल्या कमला हॅरिस यांनी निवडणूकीत जिंकल्यानंतर डेलावर येथील विलिंग्टन येथे पाहिले भाषण केले. यावेळी दोघांनीही अमेरिकन लोकांच्या ऐक्यावर जोर दिला. या प्रचंड विजयाबद्दलही बायडेन यांनी जनतेचे आभार मानले.
अमेरिकेतील राष्ट्रपतीपदाची निवडणुक जिंकल्यानंतर आपल्या विजयी भाषणात, अध्यक्ष जो बायडेन यांनी म्हटले आहे की, अमेरिकन जनतेने त्यांच्यावर आणि उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवार कमला हॅरिस यांच्यावर जो विश्वास व्यक्त केला आहे त्याचा मला अभिमान आणि सन्मान वाटतो. अमेरिकेच्या प्रमुख वृत्तसंस्थांनी दि. 3 नोव्हेंबर रोजी झालेल्या अध्यक्षीय निवडणुकीत जो बायडेन यांना विजयी घोषित केल्यानंतर ते आज प्रथमच जनतेशी संवाद साधत होते. अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुका जिंकल्याबद्दल त्यांनी जनतेचे आभार मानले.
ते म्हणाले की, बर्याच अडचणींना सामोरे जाताना अमेरिकन लोकांनी मोठ्या संख्येने मतदान केले. त्यामुळे एकदा सिद्ध झाले की, लोकशाही अमेरिकेच्या हृदयात असते. आता निवडणूक प्रचार संपुष्टात आल्याने राग, लोभ आणि कठोर वक्तृत्व सोडून मागे देश म्हणून एकत्र येण्याची वेळ आली आहे. अमेरिकेला एकत्र करण्याची वेळ आली आहे. एकमेकांना प्रेमाने व स्नेहाने पहाण्याची वेळ आली आहे. आम्हाला या देशातील लोकांनी स्पष्ट विजय मिळवून दिला आहे. अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीच्या इतिहासात सर्वाधिक ४ दशलक्ष मते जिंकली आहेत. अमेरिकेचे आपण असे वचन दिले होते की, मी अध्यक्ष झाल्यास देश व समाज तोडण्याचा प्रयत्न करणार नाहीत, तर जनतेशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करणार आहोत.