दिंडोरी – गावातील विविध विकासकामांचा पाठपुरावा करत जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी युवक पदाधिकाऱ्यांनी प्रयत्नशील राहत पक्ष संघटन मजबुत करावे असे आवाहन विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी केले.
दिंडोरी तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसची कार्यकारिणी नुकतीच तालुकाध्यक्ष शाम हिरे यांनी जाहीर केली नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तपत्र विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांचे हस्ते देण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.
पुढे बोलताना झिरवाळ यांनी गावोगाव प्राधान्यक्रमाने विकास कामे होणार असून त्याचे नियोजन युवा पदाधिकाऱ्यांनी करावे.जनतेचे प्रश्न सोडवत पक्ष संघटन मजबूत करावे व आगामी ग्रामपंचायत निवडणुकीत प्रत्येक गावात सत्ता हस्तगत करावी असे सांगितले.यावेळी जेष्ठ नेते विश्वासराव देशमुख,तालुकाध्यक्ष भास्कर भगरे,बाजार समिती उपसभापती अनिल देशमुख,डॉ योगेश गोसावी,तालुकाध्यक्ष शाम हिरे यांनी मनोगत व्यक्त केले.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसची नूतन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे: –
तालुका उपाध्यक्षपदी सतिश पाटील, ललित देशमुख, अतूल पताडे, पुंडलिक वाघेरे, प्रशांत कड, राहुल उगले, हिरामण गावीत, संतोष रेहरे, हरी गांगोडे, रोशन ढगे, सुरेश चौधरी, धनराज चौधरी, योगेश जोंधळे,मनोज खांदवे, अमोल मोरे, तालुका सरचिटणीसपदी प्रकाश पगार, नामदेव कावळे, कृष्णा मातेरे, योगेश पाटील, अक्षय गडकरी, निलेश महाले, सोमनाथ बस्ते, लहु भुसाळ, गणपत बोडके, कुनाल मुंडे, प्रभाकर वाघ, सुजित जमधडे, यांची नियुक्ती करण्यात आली. चिटणीसपदी सुनिल जोपळे, अविनाश गवळी, रावसाहेब जाधव, जगन्नाथ जाधव, निलेश गायकवाड, अतिश पवार, हेमंत राऊत, राहुल गायकवाड, भास्कर बोके, रेवन सरोदे, भरत भोये यांची तर संघटकपदी विष्णू चव्हाण, शांताराम जाधव, राहुल मुळाणे, हेंमराज बोंबले यांची निवड करण्यात आली. त्याचबरोबर सोशल मिडीया प्रमुखपदी योगेश रौंदळ, निलेश पवार, सचिन देशमुख, धनंजय ढगे, मोहाडी गटप्रमुखपदी मनोज मौले, उमराळे बु. गटप्रमुखपदी भाऊसाहेब मालसाने, कोचरगाव गटप्रमुखपदी एकनाथ भरसट, अहिवंतवाडी गटप्रमुखपदी बाळू जोपळे, वणी गटप्रमुखपदी मनोज दळवी, खेडगाव गटप्रमुखपदी अनिल ठुबे यांची निवड करण्यात आली. वणी गणप्रमुखपदी प्रदिप निरगुडे, लखमापूर गणप्रमुखपदी अजय मेधणे, खडकसुकेणे गणप्रमुखपदी गुलाब गणोरे, पालखेड उपगणप्रमुख निलेश गायकवाड, मडकीजांब गणप्रमुखपदी शशिकांत पाटील, मोहाडी गणप्रमुखपदी अतुल गडकरी, उमराळे बु. गणप्रमुखपदी नवनाथ धात्रक, ननाशी गणप्रमुखपदी रोशन गांयकवाड, कोेचरगाव गणप्रमुखपदी अनिल थेटे, अहिवंतवाडी गणप्रमुखपदी हिरामण गायकवाड, देवसाने गणप्रमुखपदी लक्ष्मण बागूल, खेडगाव गणप्रमुखपदी योगेश दवंगे, मातेरेवाडी गणप्रमुखपदी दिनकर पाटील यांची निवड करण्यात आली.
कादवा कारखान्याचे चेअरमन श्रीराम शेटे, युवकचे प्रदेशध्यक्ष महेबुबभाई शेख, जिल्हाध्यक्ष अॅड. रविंद्र पगार, रायुकॉचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग, जिल्हा बँकेचे संचालक गणपतराव पाटील, दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती दत्तात्रय पाटील, विश्वासराव देशमुख, उपसभापती अनिल देशमुख, जि.प.सदस्य भास्कर भगरे, डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ. योगेश गोसावी, गंगाधर निखाडे, डॉ. गटकळ, तौसिफ मनियार, ज्ञानेश्वर दवंगे, राजाराम ढगे ,महिला आघाडी शहराध्यक्ष कविता पगारे आदींनी अभिनंदन केले.
—
कोरोना जनजागृती ची युवकांनी जबाबदारी घ्यावी
कोरोना हा आजार भयंकर असून त्यापासून दूर राहण्यासाठी सर्वांनी जागरूक राहणे आवश्यक आहे नियमित मास्क वापरावा,सॅनिटायझर चा नियमित वापर करावा,कोणताही आजार अंगावर काढू नये त्वरित दवाखान्यात जावे तपासणी करावी.यासाठी युवक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेत जनजागृती करावी.
– नरहरी झिरवाळ, विधानसभा उपाध्यक्ष