साक्री – विंचुर- प्रकाशा महमार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले असून सार्वजनिक बांधकाम विभागाचे याकडे दुर्लक्ष.
असल्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. पिंपळनेर येथील सरकार हॉटेल ते पंचमुखी कॉर्नर पर्यंत या रस्त्यावर खड्डे मोठ्या प्रमाणात आहे. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत रस्त्यांची तात्पूरती मलमपट्टी केल्यावर सुद्धा रस्त्यांवरील खड्डे जैसे थे आहे. नागरिकांनी वारंवार सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रारी केल्या असून अद्याप तक्रारीचे निवारण करण्यात न आल्यामुळे संताप आहे. लवकरात लवकर या रस्त्याचे उत्तम दर्जाचे काम करण्यात यावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
रस्त्याचे काम केले नाही तर आंदोलन
रस्त्यांच्या या गंभीर समस्येमुळे नागरिकांची तारांबळ उडत आहे, वाहतुकीचे हाल होत आहे, या खड्ड्यांची तात्पुरती मलमपट्टी केलेली असून, खड्ड्यांची अवस्था जैसे थे झालेली आहे. या रस्त्याचे काम लवकर करण्यात यावे, जर या रस्त्याचे झाले नाही तर महराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे तिव्र आंदोलन छेडण्यात येईल.
धिरज देसले,धुळे जिल्हाध्यक्ष ,ग्रामीण, मनसे
शिवसेनाही आंदोलन करेल
या समस्येसंदर्भात प्रशासनाकडे वारंवार तक्रार केली असून अद्याप या रस्त्याचे उत्तम दर्जाचे काम करण्यात आलेले नाही, लवकरात लवकर या रस्त्याचे काम काम सुरू करण्यात यावे नाहीतर, शिवसेनेतर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल येईल.
ज्ञानेश्वर पगारे, शिव वाहतूकसेना उपजिल्हाप्रमुख, धुळे जिल्हा