बजेट आणि व्याजदर निवडा
सर्वात आधी कोणती कार घ्यायची आहे हे नक्की करून त्याद्वारे बजेट नक्की करा. त्यानंतर गाडीसाठी कर्ज घेतांना व्याजदाराचा विचार महत्वाचा असल्याने त्याकडे लक्ष द्या. बहुतांश बँकेची ओळख असणाऱ्या ग्राहकांना कमी व्याजदराने कर्ज दिले जाते. काही बँका ८ किंवा ९ टक्के व्याजदराने कर्ज देतात.
किंमतीची चाचपणी करा
कार घेतांना किमतीची चाचपणी नक्की करा. तसेच पेमेंटसाठी तुमच्याकडे कोणते मार्ग खुले आहेत याचा विचार करा. तसेच लोन घेताना तुमच्या आर्थिक सोयीचे लोन स्वीकारा. तसेच निरनिराळया लोन बद्दल माहिती मिळवा.
फी आणि रकमेविषयी माहिती घ्या
कोणतेही लोन घेते वेळी कंपनीतर्फे प्रोसेनिंग फी घेतली जाते, त्याचा नीट अभ्यास करा. लोन घेताना कोणत्याही प्रकारे फसवणूक होणार नाही यासाठी जागरूक राहा. यात प्रोसेसिंग फी सोबत, डॉक्युमेंट फी, क्रेडिट रिपोर्ट फी यासह सर्व रक्कम समजावून घ्या. तसेच अधिकृत बँकेकडून लोन घेते वेळी व्याजरदरची तुलना नक्की करा.
प्री – पेमेंट बद्दल विचारणा करा
कर्ज घेते वेळी प्री पेमेंट संबंधी विचारणा करा. ठराविक रक्कम त्यावर आकारले जाणारे कर नीट समजून घ्या. काही रक्कम आधी द्यावी लागते त्यासाठी संबंधित निकष समजून घेणे आवश्यक आहे.