पेठ – पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वांगणी गावाजवळ धरमपुर – पेठ महामार्गावर स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकास मिळालेल्या गुप्त खबऱ्याचे मार्फत मिळालेल्या माहीती नुसार संशयीत वाहनाची तपासणी केली असता त्यात प्लॅस्टीक कॅरेटच्या आड तब्बल २० लाखाचा प्रतिबंधीत पान मसाला , गुटखा मिळाला. तो पोलिसांनी हस्तगत केला. आहे.
या बाबतचे वृत्त असे की स्थानिक गुन्हा शाखेचे पो नि राजेद्र कुटे यांना मिळालेल्या गुप्त माहिती नुसार नानपोंडा येथून सफेत रंगाचा टाटा ४०७ वाहन क्रमांक एम एच१२ , एस एफ ८०१० मधून गुटखा वाहतुकीची खबर मिळाल्याने स्थानिक गुन्हा शाखेचे सपोनि अनिल वाघ , पोउनि संदीप पाटील , पो. हवा . तुपलोंढे , खांडवी यांनी गुजरातहुन येणारा सदरचा ट्रक अडवुन तपासणी केली असता महाराष्ट्रात प्रतिबंधीत असणारा गुटखा , पानमसाला आढळून आला .
सदरचा टेम्पो ताब्यात घेऊन त्याची तपासणी केली असता त्यात केशरयुक्त विमल पान मसाला २२ पाऊचचे ४१६० पॅकेट प्रत्येकी १८७ रुपये किमतीचे एकुण किंमत ७ , ७७ , ९२० , v 1 सुगंधी पाऊच २२ ४ १६० पॅकेट प्रति रू ३३ / एकुण १,३७, २८० / केशरयुक्त विमल ११ पाऊच ३३०० पुडे प्रत्येकी किंमत १५४० रु एकुण ९ , ५ ८ , ३२० रु . , v1 सुगंधी तंबाखु ११ पाऊच ३७४०पॅकेट एकुण रू८२ , २८० रु . , V1 सुगंधी पाऊच ३० , १६६४ पॅकेट एकुण रक्कम ४९, ९२० रु ., एम सुगंधी तंबाखु ६० पाऊच ८० बॉक्स प्रति ३०० / रु. एकुण रक्कम २४००० या प्रमाणे आढळून आली.
अन्न निरीक्षक राजेंद्र सुर्यवंशी व संदीप देवरे यांनी सदरचे मालाची तपासणी करूण अरोग्यास हानीकारक असल्याचा अभिप्राय नोंदविण्यात आला . ट्रकसह ड्रायव्हर अर्जुन नारायणदास देवास हल्ली रा . धानोरी पुणे व जितूराम गमणाराम माळी वय २२ हल्ली रा . धानोरी पुणे यांनी सदरचा माल नानापोडा पुनजीशेठ पूर्ण नाव माहीत नाही ) यांचे कडून भरण्यात येऊन मुकेशभाई महाराज येरवडा पूणे व चेतनसिंग राजपुरोहीत , चेनारम देवास येरवडा पुणे यांच्यासाठी वाहतुक करण्यात येत असल्याची माहीती दिली. पेठ पोलीस ठाण्यात २० लाखाचा रुपयांचा गुटखा व वाहन असा एकुण ३०लाख २९ हजार ७२० रुपये किमतीचा मुद्देमाल जमा करण्यात आला . या प्रकरणी पेठ पोलीस ठाण्यात गु . र . न . २७ / २०२१ भादवि १८६० चे कलम ३२८ , १८८ , २७२, २७३, ३४ व अन्न सुरक्षा मानके कायदा २००६ चे उल्लंघन २६ ( २ ) (i) सह कलम ३ अन्वये गुन्याची नोंद करण्यात आली .