नाशिक – शहर वाहतूक शाखेचे पोलिस निवृत्ती निंबाजी जाधव (वय ५२) यांचे रविवारी (४ ऑक्टोबर) कोरोनामुळे निधन झाले आहे. २६ सप्टेंबर रोजी त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. शहरातल्या लीलावती – सूर्या हॉस्पिटलमध्ये ते उपचार घेत होते. त्यांना श्वास घ्यायला त्रास होत असल्याने व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. शनिवारी मध्यरात्री उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या या निधनामुळे पोलिस दलातून श्र्धांजली व्यक्त करण्यात येत आहे.