देवळाली कॅम्प:- देवळाली कॅम्पच्या सौंदर्यीकरणसाठी इनरव्हील क्लबच्या माध्यमातून जे कार्य ठरवले ते साकार करण्यासाठी सर्वांनी सहकार्य केल्याने हे वाहतूक बेट साकार झाले आहे. या बेटामुळे देवळालीच्या सौंदर्यीकरणात भर पडली असून सुदंर देवळाली साकार होण्यास हातभार लागला असल्याचे प्रतिपादन इनरव्हील क्लबच्या डिस्ट्रिक्ट ३०३ च्या चेअरमन मीनल लाठी यांनी केले.
येथील नव्या बस स्थानक परिसरात जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत अवघ्या दोन महिन्यात साकार करण्यात आलेल्या इनरव्हिल वाहतूक बेटाचे लोकार्पण करण्यात आले. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध उद्योजक महाराज बिरमानी, कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष सचिन ठाकरे, उत्तम टाकळकर, अभिषेक टाकळकर, रोटरी क्लबचे अध्यक्ष मुरली राघवन, एसटीचे विभागीय नियंत्रक राजेंद्रकुमार पाटील, विभागीय वाहतूक अधिकारी कैलास पाटील, संजय गोडसे, डॉ.अरुण स्वादी, ऍड अशोक आडके,चार्टर प्रेसिडेंट निवेदीता अथनी, तनुजा घोलप, प्रकाश पाटील इनरव्हिलच्या उपाध्यक्षा मोहिनी मनचंदा, सचिव मोहिनी नरियानी, आदींसह विविध मान्यवर उपस्थित होते. अध्यक्षीय मनोगतातून महाराज बिरमानी यांनी देवळाली शहर हे एक ऐतिहासिक वारसा असून तो वारसा जतन करण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. त्याचप्रमाणे देवळालीतील सर्वांनी यासाठी प्रयत्नरत राहणे गरजेचे असल्याचे सांगितले. प्रास्ताविकातून इनरव्हिल क्लबच्या अध्यक्षा मीना पाटील यांनी सांगितले की, स्वच्छ व सुंदर देवळाली साकार करण्यासाठी आपण या वाहतूक बेटाच्या निर्मितीसाठी पाठपुरावा करत हे कार्य पूर्ण केल्याचे सांगितले.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते वाहतूक बेटाचा पडदा खोलून त्यांचे लोकार्पण करण्यात आले. कार्यक्रमात पाहुण्यांचा परिचय शशी मदान, सूत्रसंचालन प्रा.सुनीता आडके तर आभार उपाध्यक्षा मोहिनी मनचंदा यांनी केले. यावेळी वाहतूक बेट साकारणारे मूर्तिकार योगेश पाळदे, इंजिनीअर निलेश गोडसे यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अलका स्वादी, भैरवी बक्षी, पूनम ललवानी, ज्योती जॉर्ज, सुरेखा गुप्ता, आशा शेट्टी, मनीषा दोशी, पुष्पा कुलकर्णी,निर्मल वर्मा, श्रुती मदान, भाग्यश्री आढाव, पूजा टाकळकर, संतोष शिंदे आदींसह सदस्य प्रयत्नशील होते.