नवी मुंबई – वाशी टोल नाका तोडफोड प्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना १५ हजारांच्या जातमुचलक्यावर न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी ५ मेला होणार आहे. पण, पुढील सुनावणीसाठी राज ठाकरे यांना यावे लागणार नाही. राज ठाकरेंसोबत अमित ठाकरे, बाळा नांदगावकर सह मनसेचे पदाधिकारी उपस्थितीत होते.
२६ जानेवारी २०१४ रोजी वाशीमध्ये राज ठाकरे यांनी भडकावू भाषण केल्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी वाशी टोल नाका मध्ये तोडफोड केली होती. त्यानंतर वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर अनेक वेळा समन्स पाठवूनही राज ठाकरे उपस्थित राहिले नाही. त्यामुळे बेलापूर कोर्टाने त्यांच्या विरोधात वॉरंट काढले. त्यामुळे आज राज ठाकरे स्वत: आज कोर्टात हजर राहिले. त्यानंतर राज ठाकरे यांना १५ हजारांच्या जातमुचलक्यावर न्यायालयाने जामीन मंजूर केला. जामीन मिळाल्यानंतर राज ठाकरे हे ठाण्याच्या दिशेने रवाना झाले.